कत्तलीसाठी गायींची वाहतूक करणारे वाहन पकडले!

By Admin | Updated: January 24, 2017 02:15 IST2017-01-24T02:15:04+5:302017-01-24T02:15:04+5:30

वाहनचालकास अटक; सहाही गायींची मुक्तता.

Cows transported vehicles for slaughter! | कत्तलीसाठी गायींची वाहतूक करणारे वाहन पकडले!

कत्तलीसाठी गायींची वाहतूक करणारे वाहन पकडले!

मानोरा, दि. २३- येथून दिग्रसकडे जाणार्‍या मिनी ट्रकमध्ये अवैधरीत्या सहा गायींना कोंबून कत्तलीसाठी जाणारे वाहन पोलिसांनी तालुक्यातील विठोली येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपी वाहनचालकास अटक करण्यात आली आहे. सोमवार, २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता हा प्रकार उघडकीस आला.
याबाबत सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, सोमवारी मानोरा येथे गुरांचा बाजार भरतो. तेथूनच ६ गायी विकत घेऊन त्या एम एच ३८ -११0१ या मिनी ट्रकमध्ये अत्यंत निर्दयपणे कोंबून दिग्रसकडे नेत असल्याची बाब अभिषेक गणेश चव्हाण आणि त्यांच्या सहकार्यांंच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक धर्माजी डाखोरे यांनी घटनास्थळ गाठून नागरिकांच्या सहकार्याने गायी विठोली येथे बांधून ठेवल्या व मिनीट्रक जप्त करून वाहनचालकास अटक केली. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी कुणावरही कारवाई झालेली नव्हती. पुढील तपास बीट जमादार सुभाष महाजन, संदीप बरडे करीत आहेत.

Web Title: Cows transported vehicles for slaughter!