काजळेश्वर येथे प्राथमिक शाळेत कोविशिल्ड लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:29 IST2021-06-05T04:29:02+5:302021-06-05T04:29:02+5:30

गत दोन महिन्यापासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पात्र लाभार्थ्यांना देण्याचे काम पोहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या काजळेश्वर येथे ...

Covishield vaccination in primary school at Kajleshwar | काजळेश्वर येथे प्राथमिक शाळेत कोविशिल्ड लसीकरण

काजळेश्वर येथे प्राथमिक शाळेत कोविशिल्ड लसीकरण

गत दोन महिन्यापासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पात्र लाभार्थ्यांना देण्याचे काम पोहा प्राथमिक आरोग्य

केंद्रांतर्गत येत असलेल्या काजळेश्वर येथे आरोग्य पथक काजळेश्वर करीत आहे . गावात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, गाव कोरोना मुक्त रहावे करिता लसीकरणाबाबतची जनजागृती आरोग्य विभाग , ग्रा.पं. प्रशासन , शिक्षक , अंगणवाडी, आशा सेविका करीत आहेत . त्यानुसार कोविशिल्ड लसीकरण शिबिर ४ जून रोजी प्राथमिक शाळेत घेण्यात आले . यामध्ये ४५ वर्षांवरील ज्यांना ८४ दिवस पूर्ण झाले अशा लाभार्थ्यांना आणि ४५ वर्षांखालील फ्रंटलाईन वर्कर यांना पहिला डोस देण्यात आला. याकरिता आरोग्य अधिकारी डॉ. गावंडे , आरोग्य सेविका योगिता वानखडे , मंजू जाधव , कैलास पा .उपाध्ये , निकेत उपाध्ये यांचे याेगदान लाभत आहे. त्या कोणत्याही अफवांना बळी न पडता पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन तालुका आराेग्य अधिकारी किरण जाधव यांनी केले.

Web Title: Covishield vaccination in primary school at Kajleshwar