शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : आणखी एकाचा मृत्यू; ३९ कोरोना पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 13:10 IST

CoronaVirus in Washim मालेगाव येथील एका इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद शनिवारी घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद शनिवार, ३ आॅक्टोबर रोजी घेण्यात आली. दिवसभरात ३९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, आता एकूण रुग्णसंख्या ४५०२ वर पोहचली. दरम्यान, शनिवारी १०५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. त्या तुलनेत आॅक्टोबर महिन्यात कमी रुग्ण आढळून येत असल्याचे दिसून येते. शनिवारी ३९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील पुसद नाका येथील २, समर्थ नगर येथील ३, सिव्हिल लाईन येथील ३, जुनी जिल्हा परिषद परिसरातील २, चांडक ले-आऊट परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील २, लाखाळा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, सोनखास येथील १, मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील १, मालेगाव शहरातील शिक्षक कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, रिसोड शहरातील कासारगल्ली येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, सवड येथील १, चिंचाबाभर येथील १, मोठेगाव येथील १, दापुरी येथील २, वाघी येथील १, मानोरा तालुक्यातील सेवादास नगर येथील २, गिरोली येथील ३, कारंजा लाड तालुक्यातील पोहा येथील १, खेर्डा येथील १ अशा ३९ जणांचा समावेश आहे. आता एकूण कोरोनाबाधित रुग्ण ४५०२ झाले असून, यापैकी ३८४१ जणांनी कोरोनावर मात केली. आता ५६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शनिवारी १०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

मालेगाव येथील इसमाचा मृत्यूसप्टेंबर महिन्यात कोरोनाबळींची संख्या वाढली. मालेगाव येथील एका इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद शनिवारी घेण्यात आली. आतापर्यंत कोरोनामुळे ९५ जणांचे मृत्यू झाले असून, एका जणाने आत्महत्या केली आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या