शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

CoronaVirus in Akola : आणखी चौघांचा मृत्यू; ८९ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 11:00 AM

आणखी चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद २१ सप्टेंबर रोजी घेण्यात आली.

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद २१ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. दुसरीकडे दिवसभरात ८९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांची संख्या ३६४४ वर पोहोचली आहे. दरम्यान सोमवारी १०६ जणांनी कोरोनावर मात केली.सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या वाढीचा वेग अधिकच वाढला असून, कोरोनामुळे मृतकांचा आकडाही वाढला आहे. सोमवारी आणखी चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. आतापर्यंत कोरोनामुळे ६७ जणांचे मृत्यू झाले. सोमवारी दिवसभरात ८९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील सिंधी कॅम्प येथील १, नंदिपेठ येथील १, समर्थनगर १, सिव्हील लाईन्स परिसर ५, लाखाळा परिसर ४, शासकीय निवासस्थान परिसर १, जुनी आययुडीपी परिसर १, राधाई ले-आऊट परिसर १, आययुडीपी परिसर १, अकोला नाका परिसर १, शुक्रवार पेठ परिसर १, शहरातील इतर ठिकाणची १, बाभूळगाव येथील १, करंजी येथील १, काटा १, टो येथील ४, खारोळा येथील १, शिरपुटी येथील २, वारला येथील १, काजळंबा येथील १, मोहजा रोड येथील १, रिसोड शहरात ६, रिठद २, कोयाळी १, भोकरखेडा १, गोवर्धन ४, सवड २, मालेगाव शहरातील १९, अमानी १०, एरंडा २, पांगरी नवघरे २, मुंगळा ३, नागरतास १, रामनगर येथील १, जऊळका येथील १, कवरदरी १, कारंजा लाड तालुक्यातील कामरगाव येथील १ अशा ८९ जणांचा समावेश आहे. आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३६४४ झाली असून, यापैकी २७२५ जणांनी कोरोनावर मात केली. आता ८५१ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालय, खासगी कोविड हॉस्पिटल, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत.तीन पुरूष, एका महिलेचा मृत्यूजिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. सोमवारी चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद घेतली. वाशिम येथील चाणक्य ले-आऊट येथील ६० वर्षीय पुरुष, लाखाळा येथील ७८ वर्षीय महिला, आययुडीपी येथील ४६ वर्षीय पुरुष, मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील ७२ वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाने ६७ बळी घेतले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम