व्यावसायिकांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:31 IST2021-05-30T04:31:20+5:302021-05-30T04:31:20+5:30
अनसिंग परिसरात चालकांवर कारवाई वाशिम : वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या चमूने अनसिंग रस्त्यावर गत ...

व्यावसायिकांची कोरोना चाचणी
अनसिंग परिसरात चालकांवर कारवाई
वाशिम : वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या चमूने अनसिंग रस्त्यावर गत दोन दिवसांत दंडात्मक कारवाई केली. मास्कचा वापर न करणे, टिबल सीट आदी प्रकरणी ही कारवाई केली.
करडा परिसरात वीजपुरवठा खंडित
वाशिम : रिसोड तालुक्यातील करडा परिसरातील काही गावात अजूनही वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे गावकऱ्यांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी शुक्रवारी वीज वितरण कंपनीकडे केली आहे.
रिसोड येथे आरोग्य तपासणी
वाशिम : रिसोड शहरात माेठ्या प्रमाणात काेराेना बाधित वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांची काेराेना तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
रस्त्यांची दुरवस्था
वाशिम : शहरातील अंतर्गत रस्त्याची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. जुन्या आययूडीपी कॉलनीतून महामार्गावर निघणारा रस्ता पूर्णतः खरडून गेला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी या भागातील नागरिकांतून करण्यात येत आहे.
केनवड येथे कृत्रिम पाणीटंचाई
वाशिम : केनवड जिल्हा परिषद गटातील काही गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसून गावकऱ्यांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.