आरोग्यवर्धिनी केंद्रात कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:33 IST2021-01-14T04:33:57+5:302021-01-14T04:33:57+5:30

१५ जानेवारीला एकूण २७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून कोरोना विषाणूजन्य आजाराच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने कारंजा येथे ...

Corona testing at the health center | आरोग्यवर्धिनी केंद्रात कोरोना चाचणी

आरोग्यवर्धिनी केंद्रात कोरोना चाचणी

१५ जानेवारीला एकूण २७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून कोरोना विषाणूजन्य आजाराच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने कारंजा येथे ११ व १२ जानेवारी रोजी आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली होती.

उर्वरित राहिलेल्या उंबर्डा बाजार ग्रामपंचायतच्या उमेदवार व प्रतिनिधींची कोरोना तपासणी १३ जानेवारी रोजी उंबर्डा बाजार येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जवळपास ५० व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यामध्ये ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारांसह निवडणूक कक्ष प्रतिनिधीचा समावेश होता.

कोरोना तपासणी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उंबर्डा बाजार आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एस. आर. नांदे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Corona testing at the health center