शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी काळात कोरोना टेस्ट ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 17:07 IST

Coronavirus Test जवळपास दीड हजार जणांच्या तपासणी केल्या असून, २३५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दिवाळीच्या काळात अनेकजण दुसऱ्या गावांतून आपापल्या गावी परतले.  संदिग्ध रुग्णांचा अपवाद वगळता इतरांची कोरोना चाचणी करण्यात आली नाही. १ ते १९ नोव्हेंबर या दरम्यान जवळपास दीड हजार जणांच्या तपासणी केल्या असून, २३५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला.जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण ३ एप्रिल रोजी मेडशी येथे आढळून आला होता. सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू होता. या महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक वाढली. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत आहे. नोव्हेंबर महिन्यात यामध्ये आणखी घट येत असल्याचे दिसून येते. दरम्यान, दिवाळीदरम्यान अनेकजण बाहेरगावावरून आपापल्या गावी परतले. सध्या कोरोनाचा आलेख कमी असल्याने या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली नसून संदिग्ध किंवा सर्दी, ताप, खोकला व घसा दुखणे अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. दिवाळीदरम्यान अर्थात १ ते १८ नोव्हेंबर दरम्यान कोरोना चाचण्यांची संख्या गत महिन्याच्या तुलनेत फारशी कमी झाली नाही किंवा वाढलीदेखील नाही. रुग्णसंख्यादेखील स्थिर असल्याचे दिसून येते. तथापि, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता यापुढे संदिग्ध रुग्णांच्या चाचणी संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  गत महिन्यात सुरूवातीच्या १८ दिवसात जवळपास १४६० कोरोना चाचण्यांची संख्या होती. या महिन्यात दीड हजाराच्या आसपास कोरोना चाचण्यांची संख्या आहे. दीड हजारापैकी २३५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. 

संदिग्ध रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. रुग्णसंख्या तुर्तास तरी स्थिर असल्याचे दिसून येते.-डाॅ. मधुकर राठोड जिल्हा शल्य चिकीत्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम