जिल्हाधिकारी कार्यालयात ९७ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:15 IST2021-03-13T05:15:31+5:302021-03-13T05:15:31+5:30
जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रशासन व्यापक उपाय योजना करीत आहे. पाच पेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळलेल्या गावातील ...

जिल्हाधिकारी कार्यालयात ९७ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी
जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रशासन व्यापक उपाय योजना करीत आहे. पाच पेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळलेल्या गावातील प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी, जिल्हाभरातील व्यावसायिकांची कोरोना चाचणी करतानाच प्रशासकीय कार्यालयांतील प्रत्येक अधिकारी, कर्मचाºयाची कोरोना चाचणीही जिल्हाधिकाºयांनी अनिवार्य केली असून, जिल्हाधिकारी कार्यालयातही ही मोहिम राबविली जात आहे. यात बुधवार १० मार्चपर्यंत अधिकारी, कर्मचारी मिळून ९७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, यात पाच जणांच्या आरटीपीसीआर चाचणीचाही समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मिळून सर्वांचीच कोरोना चाचणी केली जाणार आहे.
------
अॅन्टीजन टेस्टमध्ये ३ बाधित
जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांची कोरोना चाचणी सुरू करण्यात आल्यानंतर चाचणी केलेल्या एकूण अधिकारी, कर्मचाºयांत रॅपिड अॅन्टीजन टेस्टमध्ये ३ जण बाधित असल्याचे निदान झाल्याची माहिती चाचणी करणाºया चमूकडून प्राप्त झाली आहे. त्या सर्वांना विलगीकरणात राहण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत.