१५४४ नागरिकांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:42 IST2021-03-27T04:42:45+5:302021-03-27T04:42:45+5:30
फेब्रुवारी महिन्यापासून राज्यभरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर २१ फेब्रुवारीपासून शिरपूर जैन येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात कोरोना ...

१५४४ नागरिकांची कोरोना चाचणी
फेब्रुवारी महिन्यापासून राज्यभरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर २१ फेब्रुवारीपासून शिरपूर जैन येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात कोरोना चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली. तसेच ८ मार्चपासून वयोवृद्ध नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीच्या काळात नागरिकांनी कोरोना चाचणी व लस टोचून घेण्यात उदासीनता दाखविली. त्यामुळे या दोन्ही कामाची गती फार कमी होती. २० मार्चपर्यंत शिरपूर येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात केवळ १९९ जणांनी कोरोनाची लस घेतली. तर कोरोना चाचणी करून घेण्याबाबत लोक उदासीन असल्याचे चित्र पहावयास मिळाले होते. आता मात्र दोन्हीही कामाला गती मिळाली आहे. आतापर्यंत ४६० जणांनी कोरोना लस घेतली, तर जवळपास १५४४ जणांनी चाचणी करून घेतली. २० मार्चनंतर लसीकरण व कोरोना चाचणीमध्ये गती आली आहे.
बॉक्स : शिरपूर आरोग्यवर्धिनी २१ फेब्रुवारीपासून १५४४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ६५ जण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यातील बरेचसे पॉझिटिव्ह रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.