कोरोना: कारंजा शहरात प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 16:40 IST2020-06-21T16:39:59+5:302020-06-21T16:40:07+5:30
उपाययोजनेचा एक भाग म्हणून शहरातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण २१ जूनपासून सुरू करण्यात आले.

कोरोना: कारंजा शहरात प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : कारंजा शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून शहरातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण २१ जूनपासून सुरू करण्यात आले. ३० पथकाद्वारे २३ जूनपर्यंत मतदान केंद्रनिहाय बीएलओ, बीएलओ सहाय्यक, आरोग्य कर्मचारी व अंगणवाडी सेविका अशी चार जणांची चमू एकत्रितरित्या सर्वेक्षण करणार आहे.
जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांच्या निर्देशानुसार कारंजाचे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांनी संबंधीत विभागाचे अधिकारी व कर्मचाºयांना सर्वेक्षण करण्याचे वेळापत्रकानुसार कार्य सोपविले आहे. २१ जुनपासून सर्वेक्षणाला सुरूवात झाली. २३ जुन पर्यंत ३ दिवस शहरातील मतदान केंद्र क्रमांक नुसार एकुण ३० पथक हे सर्व्हेक्षण करणार आहे. सर्वेक्षण करणाºया सर्वच कर्मचाºयांना तहसिल कार्यालयात प्रशिक्षण देण्यात आले. मतदान केंद्र क्रमांकानुसार बिएलओ, बिएलओ सहाय्यक, आरोग्य कर्मचारी व अंगणवाडी सेविका अशी चार जणांची टिम एकत्रितरित्या कार्य करीत आहे. शहरातील मतदान केंद्राची संख्या ही ६५ आहेत. त्यातील, सद्यस्थितीत ३० केंद्रांसाठी पथके तयार करण्यात आलेली आहेत. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात तपासणी सुरु असून उर्वरित केंद्रांसाठी ३ दिवसांनंतर तपासणी केली जाणार आहे.
या पथकाचे माध्यमातून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे सर्वेक्षण व तपासणी केली जाणार आहे. बिएलओ व सहाय्यक हे सर्वेक्षणपुर्वी कुटुंबाची ओळख घेणार व टिमची ओळख देऊन तपासणीच्या सर्व नोंदी घेणार आहेत. अंगणवाडी सेविकाही त्यांना या कार्यात सहाय्य करीत आहेत. कारंजा शहरातील प्रत्येक नागरिकाने आवश्यक ती माहिती चमूला द्यावी, स्वत:्नचे आरोग्य जपावे आणि कारंजा शहर कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले.