शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कोरोनाविषयक निर्बंध शिथिल; जि.प. पोटनिवडणुकीकडे लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2021 11:30 AM

Washim ZP by-elections : संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वी पोटनिवडणूक होणार की आणखी लांबणीवर पडणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :   कोरोना नियंत्रणात असल्याने जिल्ह्यातील निर्बंध ब-याच अंशी शिथिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीची ९ जुलै रोजी स्थगित केलेली प्रक्रिया पुन्हा सुरू होणार की आणखी लांबणीवर पडणार, याकडे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे. ७ जानेवारी २०२० रोजी वाशिम जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी निवडणूक झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी राज्य निवडणूक आयोगाने २२ जून २०२१ रोजी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित केला. उमेदवारी अर्ज दाखल करणे, उमेदवारी अर्जाची छाननी व वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे आदी प्रक्रिया पार पडलेली आहे. दरम्यान, कोरोनाविषयक परिस्थिती लक्षात घेऊन पोटनिवडणुकीबाबत निर्णय घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ६ जुलै रोजी दिला होता. त्याअनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने जिल्हास्तरीय अहवालावरून, पोटनिवडणूक कार्यक्रम आहे त्या स्थितीस अनुसरून ९ जुलै रोजी स्थगित केला. दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यातील निर्बंध राज्य शासनाने आणखी शिथिल केले. यामध्ये वाशिम जिल्ह्याचादेखील समावेश आहे. निर्बंध शिथिल झाल्याने तसेच उपचाराखाली केवळ दोन रुग्ण असल्याने जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याचे तूर्तास तरी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर स्थगित झालेली पोटनिवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरू केव्हा होणार, या प्रतीक्षेत इच्छुक उमेदवार असल्याचे दिसून येते. संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वी पोटनिवडणूक होणार की आणखी लांबणीवर पडणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

इच्छुक उमेदवार सर्कलमध्ये तळ ठोकून!कोरोना नियंत्रणात असल्याने आणि निर्बंध शिथिल होत असल्याने पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमावरील स्थगिती कोणत्याही क्षणी उठविली जावू शकते, ही शक्यता लक्षात घेता इच्छूक उमेदवार पुन्हा एकदा आपापल्या सर्कलमध्ये सक्रिय झाल्याचे दिसून येते. सर्कलमधील प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्ते, खंदे समर्थकांकडून आढावा घेत अधिकाधिक वेळ सर्कलमध्ये देण्यावर भर दिला जात आहे. सर्कलमधील समस्या सोडविण्यासाठी आपली उमेदवारी कशी सक्षम आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न इच्छूकांकडून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद