कोरोनाने सहा बाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले २०५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:30 IST2021-05-29T04:30:17+5:302021-05-29T04:30:17+5:30
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरासह तालुक्यात ४४, मालेगाव तालुक्यात २७, रिसोड तालुक्यात ३१, मंगरूळपीर तालुक्यात २९, कारंजा ...

कोरोनाने सहा बाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले २०५ रुग्ण
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरासह तालुक्यात ४४, मालेगाव तालुक्यात २७, रिसोड तालुक्यात ३१, मंगरूळपीर तालुक्यात २९, कारंजा तालुक्यात ४४; तर मानोरा तालुक्यात १८ रुग्ण नव्याने निष्पन्न झाले आहेत. जिल्ह्याबाहेरील १२ बाधितांची नोंद घेण्यात आली आहे.
.........................
‘ॲक्टिव्ह’ रुग्णांच्या आकडेवारीत घट
साधारणत: १५ फेब्रुवारी २०२१ नंतर जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट आली. त्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. यामुळे शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी कोविड केअर सेंटरही रुग्णांच्या गर्दीने ‘हाऊसफुल्ल’ व्हायला लागले होते. या पार्श्वभूमीवर संसर्गाची साखळी खंडित होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने ९ मेपासून कडक निर्बंध लादले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसत असून ‘ॲक्टिव्ह’ अर्थात उपचारार्थ रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत परिणामकारक घट झाली आहे.
..................
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ३९६८३
ॲक्टिव्ह – २७०७
डिस्चार्ज – ३६५२४
मृत्यू – ४५१