मनोरुग्णांना कोरोनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:27 IST2021-02-05T09:27:09+5:302021-02-05T09:27:09+5:30
काेराेना काळात वाशिम येथील मानसाेपचार तज्ज्ञांनी साडेपाच हजाराच्या जवळपास मनाेरुग्णांवर उपचार केले आहेत. जिल्ह्यात २९ हजाराच्या जवळपास मनाेरुग्ण ...

मनोरुग्णांना कोरोनाचा फटका
काेराेना काळात वाशिम येथील मानसाेपचार तज्ज्ञांनी साडेपाच हजाराच्या जवळपास मनाेरुग्णांवर उपचार केले आहेत. जिल्ह्यात २९ हजाराच्या जवळपास मनाेरुग्ण असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत हाेते. काेराेना काळात यातील साडेपाच हजाराच्या जवळपासच रुग्णांनी उपचार घेतले असल्याची माहिती मानसाेपचार तज्ज्ञांनी दिली. उपचार घेतलेल्या रुग्णांची प्रकृती ठीक दिसून येत असली तरी ज्यांनी उपचार घेतले नाही, असे दरराेज ५०० ते ६०० रुग्ण उपचारासाठी येत आहेत. काेराेना काळामध्ये उपचार घेण्यास अडचणी निर्माण झाल्याने अनेक मनाेरुग्णांना आटाेक्यात आणने कुटुंबीयांना शक्य झाले नव्हते.
.....................
मनोरुग्णांमध्ये चिडचिड वाढली
मनाेरुग्णांना त्यांच्या मनासारखे वागणे आवडते; परंतु मनाेरुग्ण काही उचापती करू नये, याकरिता कुटुंबीय विशेष लक्ष ठेवून त्यांना नेहमी अटकाव करतात. यामुळे त्यांच्यामध्ये चिडचिड वाढतेय, तसेच मनायाेग्य वागता येत नसल्याने ताणतणाव वाढलेला दिसून येताे. काही मनाेरुग्णांना फिट येणे, विसर यामुळे चिडचिड हाेतेय. काही जण नशा करीत असल्याने नशा पदार्थ न मिळाल्यास चिडचिड करून अनुचित घटना घडताहेत. मनाेरुग्णांमध्ये चिडचिड करणे वाढल्यास त्यांच्यासाेबत कशी वागणूक असावी, याचा सल्ला तज्ज्ञांकडून घेणे आवश्यक आहे.
.............
काेराेना काळात कुठेही बाहेर जाता येत नसल्याने मनाेरुग्णांवर उपचार करणे कुटुंबीयांसाठी कठीण हाेते. अशावेळी त्यांच्या म्हटल्यानुसार वागणे याेग्य असते; परंतु ते करीत असलेल्या कार्यामुळे संपूर्ण कुटुंबात चिडचिड येते. काेराेना काळातही माझ्याकडे आलेल्या जवळपास साडेपाच हजार मनाेरुग्णांवर उपचार केले आहेत. मनाेरुग्णांसाेबतच वागणूक सहानुभूतीपूर्वक व त्यांना समजून घेणारी असणे गरजेचे आहे. याकरिता मानसाेपचार तज्ज्ञांशी चर्चा करून उपचार आवश्यक आहेत.
डाॅ. नरेशकुमार इंगळे,
- मानसाेपचार तज्ज्ञ, वाशिम.
.............