कोरोनाने मृत्युच्या प्रमाणात परिणामकारक घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:47 IST2021-08-14T04:47:08+5:302021-08-14T04:47:08+5:30
जिल्ह्यात एप्रिल २०२० या महिन्यात शिरकाव झालेल्या कोरोना संसर्गाच्या संकटाने पुढील काहीच महिन्यांमध्ये जिल्ह्यात अक्षरशः हाहाकार माजविला. संसर्गाच्या पहिल्या ...

कोरोनाने मृत्युच्या प्रमाणात परिणामकारक घट
जिल्ह्यात एप्रिल २०२० या महिन्यात शिरकाव झालेल्या कोरोना संसर्गाच्या संकटाने पुढील काहीच महिन्यांमध्ये जिल्ह्यात अक्षरशः हाहाकार माजविला. संसर्गाच्या पहिल्या लाटेत ७ हजार ४३० ; तर दुसऱ्या लाटेत ३४ हजार २५१ (१२ सप्टेंबर अखेर) असे एकूण ४१ हजार ६८१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा ६३७ वर पोहोचलेला आहे. त्यातील सर्वाधिक मृत्यू हे दुसऱ्या लाटेत झाले. साधारणता फेब्रुवारी महिन्यापासून आलेल्या दुसऱ्या लाटेची तीव्रता मे महिन्यात झपाट्याने वाढली. १२ मे ते १२ जून या कालावधीत कोरोनाने तब्बल २५० जणांचा जीव गेला. त्यानंतर मात्र जून महिन्यापासून संसर्गाचे प्रमाण झपाट्याने ओसरायला लागले. १३ जून ते १२ जुलै या कालावधीत २४; तर १३ जुलै ते १३ ऑगस्ट या कालावधीत केवळ १२ जणांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्याचे शासकीय आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
.......................
‘ ॲक्टिव्ह ’ रुग्णसंख्या प्रथमच निच्चांकावर
जिल्ह्यात साधारणता मे २०२० पासून कोरोना संसर्गाचे संकट वाढायला लागले. तेव्हापासून जुलै २०२१ अखेरपर्यंत ‘ॲक्टिव्ह’ रुग्णांचा आकडा सातत्याने फुगत राहिला ; मात्र सध्या प्रथमच ही संख्या निच्चांकावर गेलेली आहे. १३ ऑगस्टला प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनाचे १० ‘ॲक्टिव्ह’ रुग्ण होते.
.........................
मृत्यू व ॲक्टिव्ह रुग्णसंख्येवर एक नजर
१२ मे - ३४८ / ४३१७
१२ जून - ५९८ / ६९४
१२ जुलै - ६२२ / ११७
१२ ऑगस्ट - ६३७ / १२
मृत्यू / ॲक्टिव्ह रुग्णसंख्या