Corona Cases in Washim : कडक निर्बंधात आढळले ३६४९ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 11:18 AM2021-05-18T11:18:25+5:302021-05-18T11:18:33+5:30

Corona Cases in Washim: कडक निर्बंधादरम्यान तब्बल ३६४९ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

Corona Cases in Washim: 3649 new patients found under strict restrictions | Corona Cases in Washim : कडक निर्बंधात आढळले ३६४९ नवे रुग्ण

Corona Cases in Washim : कडक निर्बंधात आढळले ३६४९ नवे रुग्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधादरम्यान तब्बल ३६४९ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कडक निर्बंधापूर्वीच्या आठ दिवसांत ३७१७ रुग्ण आढळून आले होते.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण रुग्ण ३ एप्रिल रोजी आढळून आला होता. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने, कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ९ ते १५ मे या दरम्यान कडक निर्बंध लागू केले होते. मेडिकल, दवाखाने, रुग्णवाहिका, अंत्यसंस्कार आदी अत्यावश्यक कारणांसाठी नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा होती. बाजारपेठही कडकडीत बंद ठेवण्यात आली. 
त्यामुळे या दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या ही पूर्वीच्या तुलनेत बऱ्याच अंशी कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना कडक निर्बंधाच्या कालावधीत रुग्णसंख्येत फारशी घट आली नसल्याचे दिसून येते. कडक निर्बंध लागू होण्यापूर्वीच्या आठ दिवसात अर्थात १ ते ८ मे या दरम्यान ३७१७ रुग्ण आढळून आले होते तसेच उपचारादरम्यान ३५ जणांचा मृत्यू झाला. कडक निर्बंध लागू झाल्याच्या आठ दिवसात ३६४९ रुग्ण आढळून आले तर उपचारादरम्यान ३७ जणांचा मृत्यू झाला. कडक निर्बंधादरम्यान रुग्णसंख्या कायम असल्याने मागील कारणीमिमांसा करणे, सूक्ष्म नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करणे अपेक्षित ठरत आहे. विशेषत: ग्रामीण भागात स्वतंत्र शौचालय, स्वच्छतागृह व इतर फारशा सुविधा नसतानाही गृहविलगीकरणाला परवानगी दिली जात असल्याने त्या कुटुंबातील इतर सदस्यही बाधित होत असल्याचे दिसून येते. याकडे प्रशासनाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. 

Web Title: Corona Cases in Washim: 3649 new patients found under strict restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.