गॅस दरवाढीमुळे चुलीवर स्वयंपाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:45 IST2021-09-27T04:45:53+5:302021-09-27T04:45:53+5:30
............. वाशिम परिसरात अवैध रेती वाहतूक वाशिम : जिल्ह्याबाहेरील वाहनांमधून अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असून अशा वाहनांवर कारवाई करण्यात ...

गॅस दरवाढीमुळे चुलीवर स्वयंपाक
.............
वाशिम परिसरात अवैध रेती वाहतूक
वाशिम : जिल्ह्याबाहेरील वाहनांमधून अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असून अशा वाहनांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी युवकांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनीही याप्रकरणी कारवाईकडे विशेष लक्ष पुरविण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.
...........
दुचाकींवर ट्रिपल सीट वाहतूक
वाशिम : वेळोवेळी दंडात्मक कारवाई करूनही शहरात अनेक ठिकाणांहून दुचाकी वाहनांवर ट्रिपल सीट वाहतूक सुरूच असल्याचे दिसून येत आहे. शहर वाहतूक विभागाने याप्रकरणी रविवारी पुन्हा काही वाहन चालकांवर धडक कारवाईची मोहीम राबविली. याअंतर्गत दंड वसूल करण्यात आला.
.........
डिझेलचे दर कमी करण्याची मागणी
वाशिम : खरीप हंगाम संपण्याच्या मार्गावर असून आगामी रब्बी हंगामासाठी शेती सज्ज ठेवावी लागणार आहे. त्यासाठी विशेषत: ट्रॅक्टरद्वारे मशागतीची कामे करावी लागतात. ही बाब लक्षात घेता वाढलेले डिझेलचे दर कमी करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
.............
गावठाण सर्वेक्षण काम संथ गतीने
वाशिम : गावठाण सर्वेक्षणाचे काम कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करा. त्यासाठी तालुकास्तरीय समिती सदस्यांनी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, असे आवाहन करण्यात आले; मात्र हे काम संथ गतीने होत असल्याचे दिसत आहे.