सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात दीक्षांत समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:24 IST2021-07-24T04:24:21+5:302021-07-24T04:24:21+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री देशमुख, तर विशेष अतिथी म्हणून महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष स्नेहदीप सरनाईक हे होते. ...

Convocation Ceremony at Sarnaik College of Social Work | सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात दीक्षांत समारंभ

सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात दीक्षांत समारंभ

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री देशमुख, तर विशेष अतिथी म्हणून महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष स्नेहदीप सरनाईक हे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य प्रा.डॉ. केशव गोरे (पंचफुला देवी पाटील समाजकार्य महाविद्यालय, अकोला), तर प्रमुख उपस्थितीत प्रा.डॉ. संजय साळीवकर, प्रा. किशोर वाहणे (विभाग प्रमुख), श्री. विजय देशमुख (प्रबंधक) व प्रा. वसंत राठोड यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय साळीवकर यांनी केले. त्या नंतर उन्हाळी २०२० च्या विद्यापीठ परीक्षेतील पदवी व पदव्युतर सत्रातील विद्यार्थ्यांना पदवी वितरित करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. पंडित नरवाडे, प्रा. प्रसेनजीत चिखलीकर, प्रा. विजय वानखेडे, कृष्णकांत वक्टे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गजानन हिवसे यांनी, तर आभार प्रदर्शन प्रा. विजय वानखेडे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रा. डॉ. संजय साळवे, प्रा. रवींद्र पवार, प्रा. गजानन बारड, प्रा. मंगेश भुताडे, प्रा. पंढरी गोरे, प्रा. जयश्री काळे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Convocation Ceremony at Sarnaik College of Social Work