शेतकऱ्यांना पटविले सकस अन्न व पोषणाचे महत्त्व!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:44 IST2021-08-27T04:44:55+5:302021-08-27T04:44:55+5:30
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. रविंद्र काळे, तर उदघाटक म्हणून आयएफडीसी या संस्थेच्या सहायक ...

शेतकऱ्यांना पटविले सकस अन्न व पोषणाचे महत्त्व!
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. रविंद्र काळे, तर उदघाटक म्हणून आयएफडीसी या संस्थेच्या सहायक व्यवस्थापक ललिता चवरे, तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून शास्त्रज्ञ एस. के. देशमुख, आर.एस.डवरे, एन.बी.पाटील, डी. एन. इंगोले, टी. एस. देशमुख व शुभांगी वाटाणे उपस्थित होते. गृहविज्ञान शाखेच्या प्रमुख शुभांगी वाटाणे यांनी शेतकरी तसेच महिलावर्गाच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत उहापोह करतानाच आरोग्यम धन संपदा या युक्तीनुसार प्रथिनेयुक्त पिके, भाजीपाला व फळ आहाराचे महत्व या अनुषंगाने जैव सुदृढ वाणांबाबत माहिती देत कुपोषणाला आळा घालण्याचे आवाहन केले. इतर मान्यवरांनीही पोषण परस बाग, संतुलित आहाराचे महत्व, सेंद्रीय शेती व स्वास्थ्यवर्धक आहार या विषयावर समयोचित माहिती दिली.
--------
१५ गावांतील शेतकरी, महिलांचा सहभाग
कार्यशाळेला रिसोड व मालेगाव तालुक्यातील गोभणी, लिंगा, पाचंबा, खडकी, आडोळी, ब्राम्हणवाडा, मांगवाडी, शेलगाव, वाकद, नेतंसा, भर जहागीर, आसोला, नावली, मोठेगाव, पार्डी तिखे आदि १५ गावातील महिला व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. सूत्र संचालन शुभांगी वाटाणे, तर आभार प्रदर्शन उमेदचे प्रभाग समन्वयक अविनाश गंगावणे यांनी केले.