२७00 एकरावर सिंचनाची सोय
By Admin | Updated: July 31, 2015 01:05 IST2015-07-31T01:05:12+5:302015-07-31T01:05:12+5:30
‘आपलं गाव, आपलं पाणी’ प्रकल्पातंर्गत वाशिम जिल्ह्यातील १८ गावांचा समावेश.

२७00 एकरावर सिंचनाची सोय
वाशिम : मानव विकास मिशन अंतर्गत भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ह्यआपलं गाव, आपलं पाणीह्ण या प्रकल्पातून १८ गावांतील २७00 एकरावरील सिंचनाची सोय झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारल्याने पिके करपली जात आहेत. यामध्ये ज्या गावांमध्ये ह्यआपलं गाव, आपलं पाणीह्ण प्रकल्प राबविण्यात आला आहे, त्या गावातील पाण्याची पातळी वाढलेली असून, याद्वारे या भागातील पिके डौलदार स्थितीत असल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक बळवंत गजभिये यांनी दिली. जिल्ह्यातील १८ गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात आला असून, यामध्ये वाशिम, मालेगाव, रिसोड तालुक्यातील प्रत्येकी पाच व मंगरुळपीर तालुक्यातील तीन असे एकूण १८ गावांचा समावेश आहे. वाशिम तालुक्यातील वाळकी, बिटोडा तेली, पांडवउमरा, दोडकी, सोयता, मालेगाव तालुक्यातील अनसिंग, वाकद, वाघजूळ, ब्राम्हणवाडा, शेलगाव खवले, मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी, खडी, सार्सी व रिसोड तालुक्यातील वाकद, पार्डी तिखे, कंकरवाडी, सायखेडा, लेहणी या गावांचा समावेश आहे. या गावातील ह्यआपलं गाव, आपलं पाणीह्ण या प्रयोगामुळे भूजलाचे पुनर्भरण तर झालेच, शिवाय पाणीटंचाईवरसुद्धा मात झाली आहे. पावसाचे पाणी साठवून ठेवल्याने पावसाने दडी मारलेल्या काळात याचा उपयोग शेतकर्यांना होत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. याकरिता भूजल सर्वेक्षण विभागाने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील १८ गावांमध्ये हा प्रकल्प राबवून कुठेही पाणी वाहून न जाता, त्या-त्या गावात सिमेंट बंधारे बांधण्यात आलेत. याचा उपयोग जिल्ह्यातील शेतकर्यांना होत आहे. २0१३ मध्ये प्राथमिक स्वरूपात जिल्ह्यातील चार गावांमध्ये राबविण्यात आला. याचा फायदा पाहता २0१४-२0१५ मध्ये १८ गावे समाविष्ट करण्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळे गावातील हातपंप, विहिरींच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे.