राष्ट्रध्वजाचा अवमान; गुन्हा दाखल
By Admin | Updated: January 28, 2015 00:00 IST2015-01-28T00:00:24+5:302015-01-28T00:00:24+5:30
वाशिम जिल्ह्यातील घटना.
_ns.jpg)
राष्ट्रध्वजाचा अवमान; गुन्हा दाखल
मालेगाव (वाशिम) : प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे घडली. याप्रकरणी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालेगाव पोलीस स्टेशनला वाशिम येथील शेख अनवर शेख जाफर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते २६ जानेवारी रोजी दुपारी पशू वैद्यकीय दवाखान्यासमोरुन जात होते. याठिकाणी त्यांना राष्ट्रध्वज हा छोटा व वाकड्या खांबावर लावलेला दिसून आला. ध्वजाची एक बाजू भिंतीला घासल्याने खराब झाली होती. त्यामुळे शेख जफर यांनी मालेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याविरुद्ध राष्ट्रीय सन्मान अप्रतिष्ठेस प्रतिबंध अधिनियमन १९७१ चे कलम २ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.