निबंधक कार्यालयाचे बांधकाम रखडले!
By Admin | Updated: February 20, 2016 02:20 IST2016-02-20T02:20:18+5:302016-02-20T02:20:18+5:30
नवीन इमारतीसाठी एक कोटी रुपयांचा निधी जानेवारी २0१३ मध्येच मंजूर.

निबंधक कार्यालयाचे बांधकाम रखडले!
विवेकानंद ठाकरे / रिसोड
दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारे येथील दुय्यम निबंधक श्रेणी एकच्या कार्यालयाचे बांधकाम तीन वर्ष पूर्ण होऊनही पूर्णत्वाकडे आले नाही. बांधकाम का रखडले, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
नगर परिषद कार्यालय व पोलीस स्टेशन कार्यालयाच्या अगदी जवळ व गावाच्या मध्यभागी दुय्यम निबंधक श्रेणी एकचे कार्यालय आहे. ६0 वर्षांपासून एका छोट्या कार्यालयात खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू आहेत. जुनी इमारतीची दुरवस्था झाल्याने नवीन इमारतीसाठी एक कोटी रुपयांचा निधी जानेवारी २0१३ मध्ये मंजूर झाला होता. आकर्षक व सुसज्ज इमारत होणार व जुन्या कार्यालयाचा कायापालट होणार आहे, असे सांगितले जात होते. सदर बांधकामास तीन वर्षांपासून प्रारंभ झालेला असला तरी बांधकाम मात्र संथगतीने सुरु आहे. अद्यापही बांधकाम पूर्णत्वास गेले नाही. बांधकामास किती वर्षे लागणार, याबाबत निश्चित सांगता येणार नाही, असे खुद्द अधिकार्यांकडून सांगितले जाते.
जुन्या कार्यालयात काही दिवसांपूर्वी ह्यवटवाघुळह्णचे वास्तव्य होते. दस्तावेजाचे जतन करणे कठीण झाले आहे. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे नवीन इमारत पूर्ण होणे गरजेचे बनले आहे.