शाळेलगत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:41 IST2021-03-20T04:41:38+5:302021-03-20T04:41:38+5:30
वाशिम - तालुक्यातील तोरणाळा येथे सार्वजनिक शौचालय मंजूर झाले असून, त्याचे बांधकाम सुरू आहे. शौचालय बांधकामासाठी जी ...

शाळेलगत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम
वाशिम - तालुक्यातील तोरणाळा येथे सार्वजनिक शौचालय मंजूर झाले असून, त्याचे बांधकाम सुरू आहे. शौचालय बांधकामासाठी जी जागा निश्चित करण्यात आली. ती जिल्हा परिषद शाळेलगत असून, बाजूला पाणी पुरवठा योजनेचा जलकुंभ (टाकी) आहे. त्यामुळे सदर शौचालयाचे बांधकाम थांबवून इतर ठिकाणी करण्यात यावे, अशी तक्रार ग्रा.पं सदस्य ज्ञानेश्वर चौधरी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेकडे केली आहे.
तक्रारीत नमूद केले की, सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम जि.प. शाळेलगत झाल्यास दुर्गंधी सुटून विद्यार्थ्यांच्या आराेग्यास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक पाहता सार्वजनिक शौचालयासाठी गावालगत अनेक ठिकाणी मोकळी जागा असताना सुद्धा जि.प. शाळेजवळ बांधकाम केल्या जात आहे. विद्यार्थी व ग्रामस्थांच्या आरोग्याचा विचार करता सदर शौचालयाचे बांधकाम थांबवून दुसऱ्या ठिकाणी मोकळ्या जागेत बांधकाम करावे, अशी मागणी ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.