श्रमदानातून मातीनालाबांधाची निर्मिती
By Admin | Updated: April 24, 2017 14:09 IST2017-04-24T14:09:54+5:302017-04-24T14:09:54+5:30
तालुक्यातील जयपुर येथे जिल्हाधिकारी माती नाला बांध एकुण नग २ श्रमदानातून तयार करण्यात आला.

श्रमदानातून मातीनालाबांधाची निर्मिती
कारंजा लाड : तालुक्यातील जयपुर येथे जिल्हाधिकारी माती नाला बांध एकुण नग २ श्रमदानातून तयार करण्यात आला. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, तालुका कृषी अधिकारी समाधान धुरधुळे, गटविकास अधिकारी डी.बी.पवार, विस्तार अधिकारी साई चव्हान व नायब तहसिलदार पचारणे, बुटे, मंडळ अधिकारी, पटवारी, कृपी सहायक आदी कर्मचाऱ्यांचा श्रमदानासाठी सहभाग होता.
या सर्व अधिकारी व कर्मचारी वगार्नी सांयकाळी ५ वाजता पासून ते सांयकाळी ८ वाजेपर्यंत श्रमदान केले. या श्रमदानात गावकऱ्यांसह, शहरातील कारंजा शहरातील राधाताई मुरकुटे, माया धोटे यांच्या सहमित्र परीवार तसेच काकडशिवनी येथील २५ युवकांचा श्रमदानासाठी सहभाग होता. या श्रमदानात उपविभागीय महसुल अधिकारी डॉ.शरद जावळे यांची कन्या देवयानी जावळे हीने सुध्दा सहभाग घेऊन श्रमदानात हिरहिरीने भाग घेतला.