भाववाढ विरोधात काँग्रेसचे आंदोलन

By Admin | Updated: July 7, 2014 23:47 IST2014-07-07T23:47:10+5:302014-07-07T23:47:10+5:30

केंद्रसरकारच्या विरोधात मोटरसायकलसह पायदळ चालण्याचे आंदोलन केले.

Congress's movement against inflation | भाववाढ विरोधात काँग्रेसचे आंदोलन

भाववाढ विरोधात काँग्रेसचे आंदोलन

वाशिम : डिझेल ,पेट्रोल व रेल्वेच्या भाववाढीच्या निषेधार्थ वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीने ६ जुलै रोजी भाजप प्रणित केंद्रसरकारच्या विरोधात मोटरसायकलसह पायदळ चालण्याचे आंदोलन केले. यावेळी काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष अँड. दिलीपराव सरनाईक , दिपकराव भांदुर्गे, परशराम भोयर, चक्रधर गोटे, राजूभाऊ चौधरी, दिलीप देशमुख, नथ्थुजी कापसे, वाय. के. इंगोले, राजूभाऊ वानखेडे, प्रा. संतोष दिवटे, अबरार मिर्झा, शंकर वानखेडे, विशाल सोमटकर, अँड. अंभोरे, आत्माराम अडागळे, श्याक उफाडे, प्रल्हादराव उलेमाले, गजानन भोने, प्रा. दादाराव देशमुख, अजय वाघ, सुभाष देवहंस, चंद्रकांत इंगोले, अर्जुन उदगिरे, कैलास थोरात, मोहन इंगोले आदींसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. याचप्रकारे मंगरूळपीर येथे निषेध व्यक्त करीत तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तालुका कॉग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष अँॅड.प्रकाश इंगोले,शहरध्यक्ष जावेद सौदागर,जि.प.सदस्य राजेश जाधव,महिला कॉग्रेस प्रदेश सचिव मेघा वाघमारे, तालुकाध्यक्षा रेखा शिंदे, बानो चौधरी,राधिका केदार, मिलींद पाकधने, आदीची उपस्थिती होती.

Web Title: Congress's movement against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.