भाजपाच्या उमेदवारीकडे काँंग्रेसचे लक्ष
By Admin | Updated: August 19, 2014 23:44 IST2014-08-19T23:44:08+5:302014-08-19T23:44:08+5:30
शिवसेना व रिपाइंचीही वाशिम मतदारसंघावर दावेदारी

भाजपाच्या उमेदवारीकडे काँंग्रेसचे लक्ष
जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिम विधानसभा मतदारसंघातील राजकारण आजमितीला चांगलेच चर्चेत आले आहे. अलिकडच्या काळात एकदा काँग्रेसचा अपवाद वगळता जास्तीत जास्त काळ या मतदारसंघावर भाजपाचेच वर्चस्व राहिले आहे. परंतु या मतदारसंघात आता महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना व रिपाई आठवले गटानेही आपली दावेदारी केली आहे. जर हा मतदारसंघ परंपरेने भाजपा वा काँग्रेसकडेच कायम राहिल्यास महायुती कोणता उमेदवार देते त्यानंतर आपला उमेदवार कोण ठेवायचा याचे गणीत जूळविण्याचे काम काँग्रेसने चालविल्याचे चित्र आहे. आजघडीला हा वाशिम-मंगरुळपीर मतदारसंघ महायुतीतील भाजपाकडे आहे. होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडे विद्यमान आमदारांसह डझनाच्यावर इच्छूक आहेत. यामध्ये सात इच्छूकांची नावे उमेदवारी मिळविण्याच्या शर्यतित सर्वात जास्त आघाडीवर आहेत. दुसरीकडे परंपरेनुसार भाजपाशी टक्कर देणार्या काँग्रेसकडेही इच्छूकांची संख्या कमी नाही. वाशिम विधानसभा मतदार संघात जवळपास ३५ जणांनी काँग्रेसकडे उमेदवारी मिळण्यासाठी दावेदारी केली आहे.यामधील काहींनी तर उमेदवारी पक्की करण्यासाठी जोरदार फिल्डींगही लावल्याची माहिती असून दोन्ही आघाडीच्या पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नात आहेत. उमेदवारांच्या पक्षङ्म्रेष्ठींकडील वार्यांमधून येणारे संदेश कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला वाव देत असून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत कमालीची साशंकता असल्याचे चित्र निर्माण करत आहेत. परंपरेनुसार जो पक्ष निवडून येतो त्या पक्षाच्या विद्यमान आमदाराची दावेदारी संबंधीत मतदारसंघावर पक्की मानली जाते. वाशिमच्या बाबतीत मात्र तसे होतांना दिसत नाही. सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणूकांना सामोरे जाण्याची तयारी करतांना आघाडी असो वा युती आपल्या पक्षाकडून इच्छूक कोण याची चाचपणी करीत असल्याने आघाड्या युत्यांचे गणित येणारी विधानसभा निवडणूक बिघडविणार तर नाही ना अशी चर्चा आता जोर धरु लागली आहे. जिल्ह्यात आजवर झालेल्या निवडणूका प्रत्येक पक्षाची ताकद वाशिम विधानसभा मतदारसंघात किती याचा अंदाज देवून गेल्या आहेत. त्यामुळे महायुतीतील पक्ष असो वा आघाडीतील पक्ष असो दोहोंकडूनही आपले राजकीय भवितव्य आजमाविण्यासाठी कंबर कसतांना दिसत आहेत. दावेदार्या करणारे प्रत्येक पक्ष आघाड्याची वा युतीची भाषा करताहेत. उमेदवारांची चाचपणी करतांना प्रत्येक पक्ष आघाडी वा युतीधर्माचा विचार करतानां दिसत नाहीत. महायुती व आघाडीचा उमेदवार कोण, त्यानंतर आपला उमेदवार कोण द्यायचा हे ठरविण्याचे काम एकला चलो रे ची भूमिका घेवून असलेले इतर राजकीय पक्ष करणार यात शंका नाही. उमेदवारी मिळविण्याचे घोडा मैदान दूर असले तरी त्यासाठीच्या कवायतींनी चांगलाच जोर पकडला आहे. आपलीच उमेदवारी पक्की मानुन काहींनी जनसंपर्क वाढविण्यावरही भर दिला आहे. या जनसंपर्कासाठी वेगवेगळे फंडे वापरण्याचे काम आपल्याकडील मनुष्यबळाच्या माध्यमातून इच्छूकांनी चालविले आहे. एकीकडे आपल्याच पक्षातील भरमसाठ इच्छूक तर दूसरीकडे विरोधी पक्षातही इच्छूकांची भरमार यामुळे आजवर परंपरागतपणे वाशिम विधानसभा मतदारसंघात लढत आलेल्या भाजपा व काँग्रेसच्या ईच्छूकांमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत कमालीची साशंकता आहे. उमेदवारी लवकर जाहीर केल्यास उमेदवाराला मतदारसंघातील जनसामान्यांपर्यंत जाण्यास भरपूर वेळ मिळू शकेल. परिणामी स्वत:ची व आपल्या पक्षाची बाजू जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम सक्षमपणे करता येवू शकते असे महायुती व आघाडीमधील प्रमुख भाजपा व काँग्रेसच्या इच्छूकांसह सर्वच पक्षांच्या इच्छूकांना वाटते. परंतू दोन्ही प्रमुख पक्षांकडे ईच्छूकांची असलेली भाउगर्दी पाहता आमदारकी उपभोगणार महायुतीतील भाजपा कोणता उमेदवार देतो त्यानंतरच आपला उमेदवार जाहीर करण्याचे धोरण आघाडीच्यावतीने मतदारसंघ वाटेवर येण्याची प्रबळ दावेदारी असणार्या काँग्रेसकडून अवलंबीले जात आहे. सर्वच पक्षाची नेतेमंडळी कोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष लावून आहेत.
मतदार संघावरील दावेदारीमुळे अनेक पक्ष अडचणीत
भाजपाच्यावतिने वाशिम विधानसभा मतदार संघात कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी विशेष लक्ष काँग्रेस पक्ष ठेवून आहे. दोन्ही पक्षात इच्छुकांची मोठया प्रमाणात गर्दी आहे. वाशिम विधानसभा मतदार संघ भाजपाच्या वाटेवर असून शिवसेना हा मतदार संघ सेनेसाठी सोडण्याची मागणी केली आहे. तसेच रिपाइं आठवले पक्षाच्यावतिनेही या मतदार संघावर दावेदारी दाखविण्यात येत असल्याने पेच निर्माण झाला आहे.