शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘वंचित’कडून उमेदवारीसाठी काँग्रेस, राकाँ, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या मुलाखती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 14:40 IST

रिसोड : रिसोड विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी १५ जुलै रोजी अकोला येथे मुलाखती दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : रिसोड विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससहभाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी १५ जुलै रोजी अकोला येथे मुलाखती दिल्या. विविध पक्षातील नेत्यांनी ‘वंचित’कडे उमेदवारी मागितल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.अकोला येथे १५ जुलै रोजी रिसोड विधानसभा मतदारसंघाकरीता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये वंचित आघाडीबरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपाच्या पदाधिकाºयांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक दिलिपराव जाधव, भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष वामनराव सानप, काँग्रेसचे माजी वाशिम शहर अध्यक्ष तथा वाशिमचे माजी नगराध्यक्ष दिपकराव भांदुर्गे, डॉ. प्रल्हाद कोकाटे, वंचित आघाडीचे प्रा. प्रशांत गोळे पाटील, जानकिराम डाखोरे, अनिल गरकळ, किरण गिºहे, डॉ. रवींद्र मोरे पाटील, सुनील लहाने पाटील, डॉ गजानन हुले आदींनी उमेदवारी मिळण्यासाठी मुलाखती दिल्या. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. वामन सानप यांच्याबरोबर त्यांचे वडील तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नारायणराव सानप हे देखील अकोला येथे उपस्थित होते.यासंदर्भात भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष वामन सानप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मागितली असून, लवकरच माझा पक्षप्रवेश होणार आहे. पक्षप्रवेशाची तारीख अद्याप निश्चित झाली नाही.राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीपराव जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, अकोला येथे गेलो होतो; परंतू यासंदर्भात ठोस काही बोलणे झाले नाही. पुढे पाहू, अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली.(तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBJPभाजपाcongressकाँग्रेस