काँग्रेसचे धरणे आंदोलन
By Admin | Updated: February 19, 2016 01:57 IST2016-02-19T01:57:25+5:302016-02-19T01:57:25+5:30
दुष्काळासंबधी अटी शिथिल करुन वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा.

काँग्रेसचे धरणे आंदोलन
वाशिम : दुष्काळासंबधी अटी शिथिल करुन वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, यांसह अन्य मागण्यांसाठी बुधवारी काँग्रेसच्यावतीने स्थानिक पाटणी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. तीन वर्षांंपासून नापिकी आणि चालू वर्षी जिल्ह्यातील शे तकर्यांचे खरीप व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहेत. शे तकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप व शिवसेना सरकार उदासीन आहे, असा आरोप करून वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकर्याची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान भाजपा सेना सरकारने रद्द करण्याच्या दुदैवी निर्णयाचा निषेध करून ग्रामस्वच्छता अभियान पूर्ववत सुरू करावे आदी मागण्या धरणे आंदोलनादरम्यान करण्यात आल्या. यावेळी माजी खासदार अनंतराव देशमुख, आ. अमित झनक, आ. हरिभाऊ राठोड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. दिलीपराव सरनाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड, माजी आमदार सुरेश इंगळे, अरविंद इंगोले, नामदेव मापारी, सभापती चक्रधर गोटे, ज्योती गणेशपुरे, सुभाष शिंदे, राजू चौधरी, किसन मस्के, विनोद जोगदंड, अँड.प्रकाश इंगोले, परशराम भोयर, दीपक भांदुर्गे, इप्तेकार पटेल, अरविंद लाठिया, निळकंठ गजभिये, प्रकाश वायभासे, अशोक गवळी, डॉ.जगदीश घुगे, गजानन पाचरणे, दिलीप देशमुख, डॉ.अरुण देशमुख, रमेश शिंदे, समाधान माने, गजानन भोने, दिलीप मोहनावाले, निळकंठ कुटे, प्रकाश राठोड, सुधीर गोळे, नथ्थुजी का पसे, अरविंद राऊत, शाम उफाडे, प्रल्हाद उलेमाले, महादेव सोळंके, प्रा. अबरार मिर्झा, मोहन इंगोले, अँड. पी.पी. अंभोरे, शिवाजी देशमुख, रंजना देशमुख, नंदाताई गणोदे, अर्जुन उदगिरे, विठ्ठल पवार, बबन गारडे, सोनु सरनाईक, रामकिसन चव्हाण, वाय.के. इंगोले यांच्यासह पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान, शेतकर्यांविषयी बेजबाबदार वक्तव्य करणार्या भाजपा आमदार गोपालकृष्ण शेट्टी यांच्या वक्त्याव्याचा यावेळी निषेध नोंदविला.