शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा रास्तारोको! शासकीय धोरणांचा नोंदविला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 16:41 IST

नाफेडमध्ये तुर, हरभरा आदी शेतमाल विक्रीसाठी ९०० अर्ज खरेदी-विक्री संघाकडे आले होते. परंतु शासनाची वेबसाईट बंद झाल्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले आहे.

मानोरा (वाशिम) : नाफेडमध्ये तुर, हरभरा आदी शेतमाल विक्रीसाठी ९०० अर्ज खरेदी-विक्री संघाकडे आले होते. परंतु शासनाची वेबसाईट बंद झाल्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले आहे. दरम्यान, संबंधितांचे अर्ज आॅनलाईन करून त्यांना एक हजार रुपये बोनस द्यावा, या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यासांठी मानोरा तालुका  कॉंग्रेसच्यावतीने दिग्रस चौकात ११ जून रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. मानोरा तालुका खरेदी विक्री संघात तब्बल ९०० शेतकºयांनी आॅनलाईनसाठी अर्ज केले होते, परंतु शासनाची वेबसाईट बंद झाल्याने शेतकरी नाफेडच्या तुर आणि हरभरा विक्रीपासून वंचित राहिले. दरम्यान, राहिलेले अर्ज तत्काळ आॅनलाईन करा व संबंधित शेतकºयांना किमान एक हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बोनस द्या, या प्रमुख मागणीसह बोंडअळीग्रस्त शेतकºयांना तातडीने मदत द्यावी, पिक कर्ज मेळावे घेवुन शेतक-यांना तात्काळ कर्ज द्यावे, कर्जमाफीची प्रकरणे तातडीने निकाली काढावी, नाफेडच्या खरेदी केंद्रावर तुर, हरभरा विक्री केलेल्या शेतक-यांना तात्काळ चुकारे देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी दिग्रस चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काही काळ वाहतुक ठप्प झाली होती. यावेळी बोलताना जिल्हा कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष दिलीपराव सरनाईक  म्हणाले, की मोदी सरकार हे फसवे असून त्यांच्या कार्यकाळात  शेतकºयांची पुरती वाताहात झाली आहे. शेतकºयांना अनेक योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकºयात असंतोष आहे, असे ते म्हणाले. यावेळी दिलीप भोजराज, शेखर बंग यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक माजी जि.प.अध्यक्ष अरविंद इंगोले यांनी केले. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष इफ्तेखार पटेल यांनी संचालन केले. गजानन राठोड यांनी आभार मानले. रास्तारोको आंदोलनात काँग्रेसचे बाजार समितिचे सभापती हरसिंग चव्हाण,  नामदेवराव पाटील, समाधान माने, मधुसुदन राठोड, अरविंद राऊत आदि शेतकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :Farmerशेतकरीwashimवाशिमcongressकाँग्रेस