सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात काँग्रेसचे धरणे
By Admin | Updated: January 22, 2015 00:26 IST2015-01-22T00:26:37+5:302015-01-22T00:26:37+5:30
वाशिम काँग्रेस कमेटीच्यावतिने जिल्हाधिकारी यांना निवेदन; निवडणुकपूर्व आश्वासनाचा विसर पडल्याच्या आरोप.

सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात काँग्रेसचे धरणे
वाशिम: केंद्रातील भाजप सरकार चुकीची धोरणे राबवित असल्याच्या निषेधार्थ वाशिम जिल्हा कॉग्रेस कमेटीच्यावतीने जिल्हाधिकरी कार्यालयासमोर २१ जानेवारी रोजी धरणे आंदोलन केले.
यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते अनंतराव देशमुख, जिल्हाध्यक्ष दिलीपराव सरनाईक, आ.अमित झनक, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी काँग्रेस कमेटीच्यावतिने जिल्हाधिकारी
यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी जतनेला दिलेली आश्वासने अद्यापही पूर्ण न केल्याने भाजपाव्दारे केंद्रातील व राज्यातील राबविण्यात येणार्या योजना या शेतकरी, शेतमजूर, अल्पसंख्याक व दलितांच्या नसून त्या केवळ उद्योजकांचे खिसे भरण्यासाठी सुरुझाल्या आहेत. यामुळे देशातील जनता हवालदिल झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणी आलेल्या राज्यातील शेतकर्यांना पुरेशी आर्थिक मदत द्यावी, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती कमी झाल्याने आपल्या देशामध्ये व राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या किंमती त्या प्रमाणात कमी करण्यात याव्या, नविन भूसंपादन कायद्यामधील शेतकरी व
भूमिमालकावरील अन्याय करणार्या तरतूदी रद्द करण्यात याव्या आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी जि.प.अध्यक्षा सोनाली जोगदंड, जिल्हा कॉग्रेसचे उपाध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, जि.प.सभा
पती ज्योती गणेशपूरे, चक्रधर गोटे, शहर कॉग्रेस अध्यक्ष दिपक भांदूग यांच्यासह जिल्ह्यातीलअसंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.