महागाईविरोधात काँग्रेसची सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:46 IST2021-07-14T04:46:58+5:302021-07-14T04:46:58+5:30
निवेदनात नमूद आहे की, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल यांच्या वाढलेल्या भावाने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. पेट्रोल तर १०७ रु. ...

महागाईविरोधात काँग्रेसची सायकल रॅली
निवेदनात नमूद आहे की, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल यांच्या वाढलेल्या भावाने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. पेट्रोल तर १०७ रु. लिटरच्या वर गेले आहे. डिझेल ९६ रु. लिटरच्या वर गेले आहे. खाद्यतेल १६० रु. लिटरच्या पार झाले आहे. सर्वसामान्य माणसाने जगायचे कसे, हा मोठा प्रश्न जनतेसमोर आहे व जगाचा पोशिंदा शेतकरी यांच्या मालावर स्टॉक लिमिटची अट लागू करून त्यांच्या तूर, चना व इतर डाळ वाणांचे भाव पाडले आहेत. स्टॉक लिमिट अट लागू झाल्यावर लगेच तूर, चना, उडीद या मालाचे भाव २०० ते ३०० रु. कमी झाले आहेत. हे केंद्र सरकार शेतकरीविरोधी, सर्वसामान्यांविरोधी आहे. केंद्र सरकारने वाढती महागाई नियंत्रणात आणून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा. स्टॉक लिमिटची अट रद्द करून जगाच्या पोशिंद्याला न्याय द्यावा. यासाठी सायकल रॅलीद्वारे आंदोलन करून निषेध नोंदविला. यावर केंद्र सरकारने जर नियंत्रण आणले नाही, तर यापुढे तीव्र आंदोलन काँग्रेसतर्फे छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी काँगेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.