शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

ओबीसी आरक्षणासाठी कॉंग्रेस, भाजपाचे वाशिम जिल्ह्यात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 18:41 IST

Agitation in Washim district for OBC reservation : आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात वाशिम, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा, रिसोड आणि मालेगाव येथे भाजपातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

वाशिम : राज्यात सत्तारूढ असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण संपुष्टात आले, असा आरोप करत या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी व ओबीसी समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने २६ जून रोजी जिल्ह्यात आंदोलन केले. दुसरीकडे केंद्र सरकार व तत्कालिन फडणवीस सरकारच्या दुर्लक्षामुळे ओबीसी प्रवर्गाला आरक्षण मिळाले नाही असा आरोप करीत केंद्र सरकारने ओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवावे, या मागणीसाठी कॉंग्रेसच्यावतीने २६ जून रोजी जिल्ह्यात आंदोलन केले.२६ जून रोजी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात वाशिम, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा, रिसोड आणि मालेगाव येथे भाजपातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीसांनी शेकडो आंदोलकांना स्थानबद्ध करून नंतर त्यांची सुटका केली. याच मागणीच्या अनुषंगाने केंद्र सरकारवर तोफ डागत कॉंग्रेसच्यावतीने आमदार अमित झनक, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीपराव सरनाईक यांच्या नेतृत्वात वाशिम, रिसोड, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा व मालेगाव येथे आंदोलन करण्यात आले.  आंदोलनादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणwashimवाशिमBJPभाजपाcongressकाँग्रेस