केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध कॉंग्रेसचे आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:29 IST2021-05-31T04:29:18+5:302021-05-31T04:29:18+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षातील कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला असून त्याचे गंभीर परिणाम ...

केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध कॉंग्रेसचे आंदोलन!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षातील कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला असून त्याचे गंभीर परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत असल्याचा गंभीर आरोप यावेळी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. वर्षाला दोन कोटी रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, काळा पैसा भारतात आणणार, १०० दिवसात महागाई कमी करणार आदी आश्वासने देत नरेंद्र मोदी सत्तेवर आले. पण सात वर्षांनंतरही आश्वासनपूर्ती झाली नाही. उलट महागाईने उच्चांक गाठला आहे. नोटाबंदीने देशातील छोटे, मध्यम, लघु उद्योग बंद पडले, बेरोजगारी प्रचंड वाढली. काळे कायदे आणून शेतकरी व कामगार देशोधडीला लावले, असा आरोप करीत जिल्हाध्यक्ष अॅड. दिलीपराव सरनाईक यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून व प्रतीकात्मक पुतळे करून आंदोलन करण्यात आले. यावेळी जि.प. सभापती चक्रधर गोटे, राजुभाऊ चौधरी, महादेव सोळंके, शंकर वानखेडे, मिलिंद पाकधने, राजू वानखेडे, विशाल सोमटकर, दिलीप देशमुख, समाधान माने, प्रल्हाद उलमाले, आझमभाई, राजू घोडीवाले, सागर गोरे, वीरेंद्र देशमुख, रेश्मा गायकवाड, योगीराज गायकवाड, बाळू कानगुडे, प्रा. के. बी. देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.