उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती गंभीर
By Admin | Updated: April 10, 2015 02:10 IST2015-04-10T02:10:47+5:302015-04-10T02:10:47+5:30
मंगरूळपीर येथील घटना; उपचारार्थ वाशिम येथे हलविले.

उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती गंभीर
मंगरु ळपीर (वाशिम): : तालुक्यातील चकवा येथील रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्र मण हटविण्याच्या मागणीसाठी उपोषण करणार्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर झाली असून, सदर महिलेला उपचारासाठी वाशिम येथे हलविण्यात आल्याची माहिती गुरुवारी मिळाली. चकवा येथे रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी चकवा येथील काही लोकांनी सोमवारपासून मगरुळपीर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला आज पाचवा दिवस झाला तरी अद्यापही दखल घेण्यात आली नाही. उपोषण करणार्या पाच व्यक्तींपैकी वर्षा मनवर या महिलेची प्रकृती गंभीर बिघडल्यामुळे तिला मंगरुळपीर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी करण्यात आलेल्या उपचाराला प्रतिसाद न मिळाल्यामुळे महिलेची प्रकृती अधिकच गंभीर झाली. त्यामुळे या महिलेला वाशिम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चकवा येथील अतिक्रमणधारक व्यक्तींमध्ये चकवा गावचे पोलीस पाटीलच सहभागी असल्यामुळे वरिष्ठ कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे समजते. गावचा प्रथम नागरिक पोलीस पाटीलच सामान्य जनतेला त्रासदायक ठरत असेल, तर न्याय मागावा तरी कोणाला, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, कायद्याचे पालन न करणार्या पोलीस पाटलास निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधित अधिकार्यांनी त्वरित लक्ष घालून उपोषणकर्त्यांंच्या मागणीची दखल घेणे आवश्यक आहे.