साथरोगाचे थैमान

By Admin | Updated: August 25, 2014 02:24 IST2014-08-25T02:01:01+5:302014-08-25T02:24:26+5:30

लोणार येथील बालकाचा मृत्यू : लोणार तालुक्यात डेंग्यू आणि मलेरियासदृश तापाचे रुग्ण वाढले.

Concussion | साथरोगाचे थैमान

साथरोगाचे थैमान

लोणार : शहरासह परिसरात डेंग्यू आणि मलेरियाने थैमान घातले असून, शहरातील रुग्णालये हाऊसफुल झाली आहेत. डेंग्यूसदृश तापेमुळे येथील साबुनपुरा मोहल्ल्यातील एका ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजता घडली.
साबुनपुरा मोहल्ल्यातील शे.तौसिक शे.तौफिक (८) या मुलाला गत दोन दिवसांपासून थंडी वाजून ताप आल्याने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तपासणीदरम्यान सदर मुलाच्या पांढर्‍या पेशी मोठय़ा प्रमाणात कमी होऊन ताप कमी- अधिक होत असे. तसेच शरीरावर सूज येण्यासारखे डेंग्यूसदृश तापाचे लक्षण आढळून आल्याने मेहकर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु या मुलाचा ताप कमी होत नसल्याने डॉक्टरांनी त्या मुलाला औरंगाबाद येथे हलविण्यास सांगितले असता, आज सकाळीच १0 वाजताच्या सुमारास मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील कोळीपुरा येथील रहिवासी असलेले विष्णू सोनुने यांच्या ८ वर्षाच्या अनिकेत या मुलाला डेंग्यू झाला आहे. त्याच्यावर चार दिवसांपासून औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती विशाल जाधव यांनी दिली.

Web Title: Concussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.