आश्वासनाने उपोषण आंदोलनाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:46 IST2021-08-25T04:46:33+5:302021-08-25T04:46:33+5:30
नक्कल ऑनलाईन मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. याप्रमाणेच आग लागून जळलेल्या घर, मरण पावलेल्या जनावरप्रकरणी नुकसानभरपाई मिळावी, ...

आश्वासनाने उपोषण आंदोलनाची सांगता
नक्कल ऑनलाईन मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. याप्रमाणेच आग लागून जळलेल्या घर, मरण पावलेल्या जनावरप्रकरणी नुकसानभरपाई मिळावी, पुरामुळे शेतीचे नुकसान झाले त्याची भरपाई मिळावी, संजय गांधी निराधार योजनेत वयाच्या पुराव्याबाबत शाळा न शिकलेल्या लोकांचे आधार कार्ड ग्राह्य धरावे, स्कॅन न झालेले आधार कार्ड रद्द करू नये, घटस्फोटित महिलेला रजिस्टर फारकत अट शिथिल करावी आदी मागण्या निकाली काढण्यासाठी २३ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर कोंडोली येथील सुदाम तायडे, सोनाबा शंबुले, किशोर रूमकर, जनाबाई शिंगाडे, नंदा देवराव भवाळ यांनी उपोषण सुरू केले होते. नायब तहसीलदार जी.एम.राठोड व संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष नीळकंठराव पाटील यांच्या मध्यस्थीने आणी मागण्या पूर्ण करण्याचे तोंडी आश्वासनाने या उपोषणाची लिंबूपाणी पाजून सांगता करण्यात आली.