मंगरुळपीर येथे कोविड लसीकरणाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:35 IST2021-01-17T04:35:17+5:302021-01-17T04:35:17+5:30
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी धन्वंतरी पूजन करून फीत कापून कोविड लसीकरणाचे उद्घाटन केले. या वेळी ...

मंगरुळपीर येथे कोविड लसीकरणाला प्रारंभ
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी धन्वंतरी पूजन करून फीत कापून कोविड लसीकरणाचे उद्घाटन केले. या वेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वर्ग-१ डॉ. एल.एन. चव्हाण यांनी सर्वप्रथम लस घेतली. कोरोना लस ही सुरक्षित असून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता घ्यावी, असे आवाहन या वेळी डॉ. चव्हाण यांनी केले. ग्रामीण रुग्णालयात १२० लस उपलब्ध असून १०० लसी देण्याचे उद्दिष्ट असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. या वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत जाधव, डॉ. अमजद खान, डॉ. अजमल वहिद, डॉ. ऋचा घुनागे, एस.एस. सोळंके, जावेद अली फारुखी, रमेश आडे, शरद गावंडे, प्रकाश संगत व इतर कर्मचारी उपस्थित होते. लस घेणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.