वाशिम पंचायत समिती अंतर्गत येणा-या ८४ ग्रामपंचायती संगणकीकृत
By Admin | Updated: February 6, 2015 02:23 IST2015-02-06T01:55:37+5:302015-02-06T02:23:21+5:30
१८ प्रकारचे दाखले ऑनलाईन; ३९ हजार दाखले वितरित.

वाशिम पंचायत समिती अंतर्गत येणा-या ८४ ग्रामपंचायती संगणकीकृत
वाशिम : संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) या महाराष्ट्र शासनाने वाशिम तालुक्यामध्ये कात टाकली आहे. या योजनेमार्फत वाशिम पंचायत समिती अंतर्गत येणार्या ८४ ग्रामपंचायतीत संगणकीकृत केल्या असून, १८ प्रकारचे दाखले आता ऑनलाईन ग्रामपंचायतीमधून नागरिकांना मिळत आहे. त्याचबरोबर या संग्राममार्फत सर्व प्रकारच्या रिचार्जसोबतच बँकिंग सुविधा मिळणार असून, या सुविधा मिळण्यास सुपखेला, सोडा, सावळी, तोरणाळा, खरोळा या ग्रामपंचायतींमध्ये झाला आहे. महाराष्ट्र शासनामार्फत सुरू केलेल्या संग्राम योजना २0११ मध्ये वाशिम तालुक्यात सक्रिय करण्यात आला; परंतु काही ग्रामपंचायतीला नेटवर्कमुळे कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने व विविध कारणार्या या विभागाचे काम कसे बसे सुरू होते; परंतु या आर्थिक वर्षामध्ये संग्रामने कात टाकली असून, ज्या ठिकाणी नेटवर्कची अडचण असेल अशा ठिकाणी संग्राम सॉफ्ट ऑफ लाईन व्हर्जन ३ मार्फत दाखले देण्याची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे ८ (अ) रहिवाशी दाखले, जन्म नोंदी प्रमाणपत्र, मृत्यू नोंदी प्रमाणपत्र, विवाह नोंदी प्रमाणपत्र, व्यवसाय नाहरकत प्रमाणपत्र, बांधकाम परवाना इत्यादी १८ प्रकारचे प्रमाणपत्र ऑनलाईन देतात येतात या विभागामार्फत एकूण सर्व प्रकारचे वाशिम पंचायत समिती अंतर्गत ३९ हजार ७९६ दाखले वितरित करण्यात आले आहेत. तसेच अपना सीएससीच्या माध्यमातून सर्व प्रकारचे मोबाईल बिल, डिस टीव्हीचे रिचार्ज, रेल्वे र्झिवेशन इलेक्ट्रिक बिल, इत्यादी सुविधाचा लाभ घेता येतो. फायनान्सियल इनक्लुजनच्या माध्यमातून गावातील लोकांना बँकेच्या सर्व सुविधा उपलब्ध होतात हे विशेष. जेथे जेथे नेटवर्क चांगल्या प्रकारे मिळते तेथे-तेथे या सुविधा प्राधान्याने सुरू केल्या जात आहेत.