संगणक पडले धुळखात
By Admin | Updated: July 8, 2014 22:51 IST2014-07-08T22:51:06+5:302014-07-08T22:51:06+5:30
बहुतांश ग्रामपंचायतचे संगणक धूळखात असल्याने ई-ग्राम पंचायतीचा तालुक्यात फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.

संगणक पडले धुळखात
मानोरा : ग्रामपंचायत कार्यालयाच्या कामकाजात गतिमानता यावी व प्रत्येक ग्रामपंचायत पेपरलेस व्हावे या हेतूने शासनाने सर्व ग्रामपंचायतींना संगणक संच दिले. तसेच संगणक ऑपरेटरची नियुक्तीही करण्यात आली. परंतु बहुतांश ग्रामपंचायतचे संगणक धूळखात असल्याने ई-ग्राम पंचायतीचा तालुक्यात फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. लाखो रूपये खर्च करून शासनाने ग्रामपंचायतला संगणक संच दिले. परंतु मागील अनेक महिन्यापासून ग्रा.पं.कार्यालयात संगणकाद्वारे कामच होत नसल्याचे दिसून आले. ज्या दिवशी संगणकावर ऑनलाईन काम असते त्या दिवशी ऑपरेटर ग्रामपंचायत कार्यालयात दिसतात. इतर दिपवशी मात्र विविध प्रकारचे दाखल हस्तलिखित दिले जाते. गावागावात गावपातळीवरच्या नेत्यांनी स्वत:च्या नातलगाची नेमणूक कॉम्प्यूटर ऑपरेटर म्हणून केली आहे. काहींना संगणकाचे पुरेसे ज्ञानही नाही. अनेक ग्रामसेवक ग्रामपंचायतीकडे फिरकत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात संगणक संच असताना हातानेच पावत्या लिहून दिल्या जातात. मानोरा तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीतील संगणक असेच धूळखात पडले आहे.