रिसोड तालुक्यातील सिंचन प्रकल्प पुर्णत्वाकडे

By Admin | Updated: May 26, 2014 00:22 IST2014-05-25T20:46:07+5:302014-05-26T00:22:47+5:30

खडकी सदार परिसरातील १२७ हेक्टर शेती सिंचनाखाली आणणार्‍या सिंचन प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

The completion of irrigation project in Risod taluka | रिसोड तालुक्यातील सिंचन प्रकल्प पुर्णत्वाकडे

रिसोड तालुक्यातील सिंचन प्रकल्प पुर्णत्वाकडे

रिसोड : खडकी सदार परिसरातील १२७ हेक्टर शेती सिंचनाखाली आणणार्‍या सिंचन प्रकल्पाचे काम लघू पाटबंधारेच्या स्थानिक विभागामार्फत सुरू आहे. हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. यामुळे हिरवे स्वप्न साकार होण्याच्या शेतकर्‍यांच्या अपेक्षा उंचाविल्या आहेत. खडकी सदार लघू पाटबंधारे विभागाने या सिंचन प्रकल्पाचे काम मागील दोन वर्षापासून सुरु केले असून या प्रकल्पामध्ये ३३ हेक्टर शेती बुडीत क्षेत्रात जाणार आहे तर १२७ हेक्टर शेती ओलीताखाली येणार आहे. या धरणाची लांबी १0२0 मिटर असून उंची ११.३ मिटर आहे. या धरणाचे काम जवळ जवळ पुर्ण झाले आहे. यापुर्वी या ठिकाणी जेमतेम एखादे पिक घेतले की आकाशाकडे डोळे लावुन बघण्याची वेळ येथील शेतकर्‍यावर होती. आता तयार होत असलेल्या तलावामुळे सिंचनातुन समृद्धी साधण्यातील अडथळा दुर होणार आहे.

Web Title: The completion of irrigation project in Risod taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.