पेयजल योजनेचे काम पूर्णत्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:40 IST2021-04-06T04:40:17+5:302021-04-06T04:40:17+5:30
0000000000 दापुरा नजीक रस्त्यावर खड्डेच खड्डे कारंजा : जड वाहनांमुळे दापुरा बसथांबा नजीक मोठमोठे खड्डे पडले ...

पेयजल योजनेचे काम पूर्णत्वास
0000000000
दापुरा नजीक रस्त्यावर खड्डेच खड्डे
कारंजा : जड वाहनांमुळे दापुरा बसथांबा नजीक मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे इतर वाहनधारकांना येथून मार्गक्रमण करताना त्रास होत आहे.
00000000000
नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम
मेडशी : मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. गत दोन दिवसात जवळपास १६० नागरिकांची तपासणी करण्यात आली. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
स्वच्छता रथाद्वारे जनजागृती
किन्हीराजा : जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागातर्फे रथाद्वारे गावोगावी घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन यासह स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती केली जात आहे. किन्हीराजा परिसरातही सोमवारी जनजागृती केली.
00000000000
पशू दवाखान्यातील रिक्त पदांमुळे अडचणी
धनज बु.: येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत तीन पदे रिक्त आहेत. त्यामुळे परिसरातील पशुपालकांना गुरांवर उपचार करण्यात अडचणी येत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात नियमित अधिकारी ही नसल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत.
00000000000
म्हसणी येथे स्वच्छतेबाबत जनजागृती
इंझोरी: मानोरा तालुक्यातील म्हसणी येथे ग्रामपंचायतकडून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, या अंतर्गत सोमवारपासून स्वच्छतेबाबत जनजागृती सुरू करण्यात आली. या उपक्रमात गावातील युवकांनी सहभाग घेतला आहे.
000000000000
प्रकल्पांवरील झुडपांची कापणी
वाशिम : विविध प्रकल्पांच्या भिंतीवर मोठमोठे वृक्ष वाढले असून, झाडांचे मूळ खोलवर जाऊन प्रकल्पाच्या भिंतीला धोका उद्भवण्याची भीती आहे. पाटबंधारे विभागाने त्याची दखल घेत झुडपे तोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
0000000
वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान
कामरगाव : परिसरात हरिण, माकड आदी वन्यप्राणी पिकांत धुमाकूळ घालत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचे २ फेब्रुवारी रोजी दिसून आले. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली.