खरीप पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट त्वरित पूर्ण करा!
By Admin | Updated: April 12, 2016 02:05 IST2016-04-12T02:05:03+5:302016-04-12T02:05:03+5:30
किशोर तिवारी यांचे वाशिम जिल्ह्यातील बँकांना निर्देश.

खरीप पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट त्वरित पूर्ण करा!
वाशिम: खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकर्यांना पीककर्जाचे वाटप करण्यासाठी देण्यात आलेले उद्दिष्ट बँकांनी ३0 मे २0१६ पयर्ंत पूर्ण करावे, अशा सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जिल्ह्यातील सर्व बँकांच्या प्रतिनिधींना दिल्या. पीककर्ज वाटप नियोजनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सोनाली जोगदंड, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती शिंदे, यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, डॉ. संदीपान सानप, डॉ. शरद जावळे, जिल्हा अग्रणी बँक भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक एस. एस. मेहता यांच्यासह सर्व तहसीलदार, विविध शासकीय विभागांचे प्रमुख व जिल्ह्यातील सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. किशोर तिवारी म्हणाले, की सततच्या नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. शेतकर्यांना या संकटातून बाहेर आणण्यासाठी बँकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्व बँकांनी शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेऊन पात्र शेतकर्यांना ३0 मे २0१६ पयर्ंत १00 टक्के पीककर्जाचे वितरण केल्यास शेतकर्यांना जमिनीची मशागत व पेरणीसाठी वेळेत मदत उपलब्ध होईल. पीककर्ज वितरणासाठी प्रत्येक बँकांना उद्दिष्ट निर्धारित करून दिले असून, हे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व बँकांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून शेतकर्यांना मदत करावी, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले, की सर्व बँकांनी ३0 मे २0१६ पयर्ंत शेतकर्यांना पीककर्जाचे १00 टक्के वितरण करावे. पीक कर्जवाटपाबाबत काही समस्या असल्यास जिल्हा प्रशासनाला कळवाव्या. त्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल.