कोरोना लसीकरण वेळेत पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:30 IST2021-05-29T04:30:21+5:302021-05-29T04:30:21+5:30
यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधिक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, अपर ...

कोरोना लसीकरण वेळेत पूर्ण करा
यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधिक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील विंचनकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गोल्हे यांची उपस्थिती होती.
सिंह म्हणाले, कोरोनाबाधितांना ठेवण्यात येणाऱ्या विलगीकरण केंद्रात पुरेशा सुविधा उपलब्ध असाव्यात. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या. बाजारपेठेत गर्दी होणार नाही, याची दक्षता घेऊन सार्वजनिक ठिकाणी वावरणारा प्रत्येक व्यक्ती हा तोंडाला मास्क लावून असला पाहिजे. कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. ‘माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आपआपल्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी, असे ते म्हणाले. जिल्ह्यात कोरोनाविषयक केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली.