शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

बीटी वाणाच्या ‘लाईव्ह सॅम्पल’चे संकलन पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:55 PM

वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यात कपाशीच्या झाडांची जिवंत पाने तोडून ‘लाईव्ह सॅम्पल’ अर्थात जिवंत नमुन्यांचे संकलन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव सुरू असल्याने बीटी वाणाचा दर्जा तपासणे आवश्यक झाले होते. यासाठी वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यात कपाशीच्या झाडांची जिवंत पाने तोडून ‘लाईव्ह सॅम्पल’ अर्थात जिवंत नमुन्यांचे संकलन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हे नमुने तपासणीसाठी  नागपूर येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून, बियाण्याचे वाणच सदोष असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आता या अहवालाकडे लक्ष लागले आहे. बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव होणे, ही बाब गंभीर आहे. या प्रकारामुळे बीटी बियाण्यांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे बोंडअळीचा प्रादूर्भाव नेमका का होत आहे. या कारणाचा शोध घेणे आवश्यक होते. यासाठी अमरावती विभागात बीटी वाणाच्या कपाशीची जिवंत पाने तोडून नमुण्यांचे संकलन करण्याची प्रक्रिया करण्यात आली. वाशिम जिल्ह्यात ७ सप्टेंबरपासून ही प्रक्रिया सुरू झाली होती. गुणनियंत्रक विभागाच्या मार्गदर्शनात १० जणांच्या चमूकडून कपाशीच्या झाडांची पाने तोडून त्यांचे नमुने तयार करण्यात आले. बीटी कपाशीच्या प्लांटमधून लाईव्ह सॅम्पलसाठी ९० झाडांच्या शेंड्याचा भाग सोडून त्याखालची परिपक्व झालेली प्रत्येकी तीन पाने तोडण्यात यासाठी तोडण्यात आली. या अंंतर्गत एका प्लांटमधून २७० पानांचे एक ‘सॅम्पल’ या प्रमाणे सहा तालुक्यातून १६२० पानांचे सहा नमुने तयार करण्यात आले.  हे नमुने थर्मोेकोलच्या डब्यात ‘आईस पॅड’मध्ये टाकून ते नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

टॅग्स :washimवाशिमcottonकापूस