वीजेबाबत तक्रारींचा पाढा

By Admin | Updated: November 22, 2014 02:23 IST2014-11-22T02:23:05+5:302014-11-22T02:23:05+5:30

वाशिम जिल्हा विद्युतीकरण समन्वय समितीची बैठक : लोकप्रतिनिधींची हजेरी.

Complaints about electricity | वीजेबाबत तक्रारींचा पाढा

वीजेबाबत तक्रारींचा पाढा

वाशिम : विद्युत बिल, रोहित्र नादुरुस्ती, नवीन जोडणी वेळेत न मिळणे आदीविषयी अनेक तक्रारी येत असल्याचे सांगून याबाबत विद्युत वितरण कंपनीने अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश खासदार भावना गवळी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय विद्युतीकरण समन्वय समितीच्या बैठकीत वितरण कंपनीने आजपयर्ंत जिल्ह्यात राबवलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला.
बैठकीला खासदार तथा जिल्हास्तरीय विद्युतीकरण समन्वय समितीच्या अध्यक्ष भावना गवळी, आमदार अमित झनक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, अमरावती प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळाचे अधीक्षक अभियंता दिनेश ज. खोंडे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता एस. पी. वाघमारे, कार्यकारी अभियंता एस. के. धडके, महापारेषणचे कार्यकारी अभियंता पी. वाय. देशमुख, ग्राहक प्रतिनिधी गोपाल पाटील येवतकार, कंत्राटदार प्रतिनिधी प्रसन्ना पळसकर, संतोष जोशी, विद्युत निरीक्षक आर. डब्लू. महालक्ष्मे, महापारेषणचे कार्यकारी अभियंता हबरडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता नितीन मेश्राम, योगेश काथार यांच्यासह विद्यूत विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक सहाय्यक विद्युत निरीक्षक पी. व्ही. चांदुरकर यांनी केले.

Web Title: Complaints about electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.