मनरेगातील देयकाच्या अदायगीत अनियमितताप्रकरणी संबधितावर होणार गुन्हे दाखल

By Admin | Updated: April 13, 2017 15:33 IST2017-04-13T15:33:25+5:302017-04-13T15:33:25+5:30

या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यासाठी पञ बनवून येत्या दोन दिवसात दोषींवर गुन्हे दाखल होतील अशी माहीती गटविकास अधिकारी योगेश जवादे यांनी गुरुवारी दिली.

The complaint will be filed on the issue of irregularities in payment of MNREGA payment | मनरेगातील देयकाच्या अदायगीत अनियमितताप्रकरणी संबधितावर होणार गुन्हे दाखल

मनरेगातील देयकाच्या अदायगीत अनियमितताप्रकरणी संबधितावर होणार गुन्हे दाखल

मंगरुळपीर -तालुक्यातील पंचायत समितीअंतर्गत मनरेगाच्या कुशल कामामधील अदायगीमध्ये तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी येवतेकर आणी सहाय्यक लेखा अधिकारी जगताप यांनी  ४४ लाख,४१ हजार, ६८० रुपये बिलामध्ये अनियमितता केल्याने मुख्याधिकाऱ्यांनी सबंधीत दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही अद्याप प्रकरण गुलदस्त्यातच असल्याने या प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला होता. आता या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यासाठी पञ बनवून येत्या दोन दिवसात दोषींवर गुन्हे दाखल होतील अशी माहीती गटविकास अधिकारी योगेश जवादे यांनी गुरुवारी दिली.
      मनरेगाअंतर्गत पंचायत समिती मंगरुळपीर येथील कुशल कामाच्या अदायगीत तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी येवतीेकर आणी सहाय्यक लेखा अधिकारी जगताप यांनी अनियमितता केल्याचे वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लक्षात आल्याने सबंधीत दोषी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करन्याचे आदेश दिनांक ३ नोव्हेंबरला दिले होते; परंतु आतापर्यतही सबंधीत दोषीवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. सदर प्रकरण हेतुपुरस्सर गेल्या चार महिन्यापासुन दडवून ठेवण्यात आल्याने मुख्याधिकार्ऱ्यांच्या आदेशांची तात्काळ अंमलबजावणी करुन योग्य कारवाई करावी या मागणीसाठी मंगरुळपीर येथील शिवसेना आक्रमक झाली होती. दोषीवर गुन्हे दाखल न केल्यात तिव्र आंदोलन छेडल्या जाईल असा ईशारा शिवसेनेने दिला होता.  यावर मंगरुळपीर येथील प्रभारी गटविकास अधिकारी योगेश जवादे यांनी लिपिक गांजरे यांना सूचना करुन गुन्हे नोंदविण्याबाबतचे पञ काढून पुढील कारवाईची प्रक्रिया दोन दिवसात करण्यात येईल असे सांगितले. 

Web Title: The complaint will be filed on the issue of irregularities in payment of MNREGA payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.