बालविवाह रोखण्यासाठी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:37 IST2021-02-14T04:37:59+5:302021-02-14T04:37:59+5:30
................... नुकसानभरपाई देण्याची मागणी किन्हीराजा : येथील उत्तम राघोजी ठाकरे यांच्या घराला अचानक आग लागून अडीच लाख रुपयांचे नुकसान ...

बालविवाह रोखण्यासाठी समिती
...................
नुकसानभरपाई देण्याची मागणी
किन्हीराजा : येथील उत्तम राघोजी ठाकरे यांच्या घराला अचानक आग लागून अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना १३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. सोयाबीन विकून आणलेले रोख १.२६ लाख रुपये, कापूस व अन्य साहित्य, असे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. अद्याप भरपाई न मिळाल्याने ती देण्याची मागणी ठाकरे यांनी केली.
................
७० जणांचे नावे कार्डातून वगळली
अनसिंग : वाशिम तालुक्यातील ११० लाभार्थींची नावे शिधापत्रिकांमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आली असून, ७० जणांची नावे शिधापत्रिकांमधून वगळण्याची कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती पुरवठा विभागाने दिली.
.................
कृषी विभागात रिक्त पदे, कामात खाेळंबा
ताेंडगाव : जिल्ह्याच्या कृषी विभागात अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची कामे होण्यास विलंब लागत आहे. कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी शेतकरी रवी भुतेकर यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे केली.
..............
खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष
शेलू बाजार : मालेगाव ते किन्हीराजा रस्त्यावर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले असताना संबंधितांकडून काेणत्याच प्रकारची दखल घेण्यात येत नसल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. दरराेज वाहनांचे नुकसान व अपघात घडत आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.