शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक : वाशिम जिल्ह्यात १३०५ पैकी ११६० कोरोना बेड रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:51 IST

Washim coronavirus News जिल्ह्यातील १३०५ पैकी ११६० कोरोना बेड रिक्त असून, ऑक्सिजनवर १९ रुग्ण आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ऑक्टोबर महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख घसरला असून, नोव्हेंबर महिन्यात यामध्ये आणखी घट झाली. सध्या जिल्ह्यातील १३०५ पैकी ११६० कोरोना बेड रिक्त असून, ऑक्सिजनवर १९ रुग्ण आहे. ही बाब जिल्हावासियांसाठी दिलासादायक ठरत आहे.जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने गंभीर रुग्णांसाठी कोविड सेंटरमध्ये बेडची संख्या वाढविली होती. ऑक्टोबरमध्ये कोरोनाचा आलेख घसरल्याने सुदैवाने बेडही मोठ्या संख्येने रिकामे झाले. नोव्हेंबर महिन्यात यामध्ये आणखी घट झाल्याचे दिसून येते.  १३०५ पैकी ११६० बेड रिक्त असून, ऑक्सिजनवरील रुग्णांसह केवळ १४५ बेड वापरात आहेत. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यामुळे आरोग्य विभागासह जिल्हावासियांची चिंताही वाढली होती. सप्टेंबरमध्ये खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडसाठी रुग्णांना वेटींगवर राहण्याची वेळ आली होती. ऑक्सिजन व नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा आलेख प्रचंड खाली आल्याने आरोग्य विभागावरील ताणही कमी झाला. दरम्यान, कोरोनाचा धोका अजून संपलेला नसल्याने नागरिकांनी यापुढेही सतर्क राहावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले. 

जिल्ह्यात कोरोनाचा आलेख घसरल्याने बेड मोठ्या प्रमाणात रिकामे राहत आहेत. परंतू कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे.- डाॅ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी वाशिम

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम