येऊ दे आपत्ती,आम्ही आहोत सज्ज

By Admin | Updated: July 13, 2014 22:32 IST2014-07-13T22:32:44+5:302014-07-13T22:32:44+5:30

अग्निशमन विभागात नव्याने दाखल झाले अत्याधुनिक साहित्य

Come on, let's die, we're ready | येऊ दे आपत्ती,आम्ही आहोत सज्ज

येऊ दे आपत्ती,आम्ही आहोत सज्ज

वाशिम: आपतकालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असेल तर कुठल्याही नैसर्गिक अथवा मानव निर्मित आपत्तीचा तितक्याच सहजतेने मुकाबला करता येऊ शकते. स्थानिक नगर पालिकेने ही यंत्रणा उभी केली आहे. पालिकेच्या आपतकालीन यंत्रणेत अत्याधुनिक अग्निशमन बंब, फ्लोट पंप, वुडन कटर सारख्या आयुधांची भर पडली आहे. त्यामुळे आता शहरवासीयांनाच नव्हे तर जिल्हावासीयांनाही आपत्तीशी लढण्याचे बळ प्राप्त झाले आहे.
पालिकेची आपतकालीन व्यवस्था दिवसागणिक कात टाकतेयं. सन २0१३ मध्ये मिळालेल्या १३ लाख रूपयातून पालिकेने आपल्या आपतकालीन ताफ्यात अत्याधुनिक बंबासह काही नविन आयुधे समाविष्ट केली आहेत. यामध्ये पैट्रोल इंजिनवर चालणारे वूडन कटर, फ्लोट पंप, स्टील ओपणर आदींचा समोवश आहे. पूर्वी पालिकेकडे आग विझविणासाठी केवळ दोनच बंब होते. सदर दोन्ही बंब मोठे असल्यामुळे गल्लीबोळातील आग विझवितांना या विभागाच्या कर्मचार्‍यांना कसरत करावी लागत होती. आता नव्याने ताफ्यात दाखल झालेला बंब हा छोटा वाहनावर असुन गल्लीबोळातही सहज फिरविता येऊ शकतो. अ्िग्नशम विभागात अत्याधुनिक आयुधांची भर पडल्यामुळे आता आपत्तीचा मुकाबला करणे नागरिकांसाठी सोपे झाले आहे.

** वूडण कटरमुळे मिळणार तात्काळ दिलासा
पावसाळ्यात होणार्‍या वादळी वार्‍यात बर्‍याचवेळा झाडे उन्मळून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडतात. शिवाय जुनाट घरे पडुन आपत्ती उद्भवण्याचेही प्रकार घडतात. अश्यावेळी या वूडन कटरचा उपयोग होवू शकतो. रस्त्यावरील झाडांची कटाई करून नागरिकांना तात्काळ दिलासा देण्याचा हा रामबाण उपायच आहे.

** फ्लोट पंप ठरणार आग विझवितांना गुणकारी
आग लागलेल्या ठिकाणी पाण्याची टाकी , तळे, नदी, नाला असेल तर त्यातून पाणी खेचून आग विझविण्यासाठी फ्लोट पंप अत्यंत महत्वाची भूमिका निभवू शकतो. बंबातील पाणी संपल्यानंतर यापंपाचा उपयोग होवू शकतो. या पंपामुळे अग्निशमन दल आणखी सुसज्ज झाले आहे.

** अत्याधुनिक अग्निशमन बंब विझविणार आग
पालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात पॉवर स्टिअरिंग तथा विविध सोयींनी युक्त असलेला अग्निशमन बंब दाखल झाला आहे. यापंपावर पाणी फवारण्याची मुव्हेबल वॉटर गण आहे. तब्बल शंभर मिटर अंतरापर्यंत या गणमधून पाण्याचा फवारा करता येऊ शकतो. या अग्निशमन बंबावर माईकची व्यवस्थाही आहे.

Web Title: Come on, let's die, we're ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.