शेतकऱ्यांच्या समस्या साेडविण्यास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:45 IST2021-09-06T04:45:40+5:302021-09-06T04:45:40+5:30
कामरगाव येथील जिप कनिष्ठ महाविद्यालय व कला महाविद्यालयातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ३ सप्टेंबर रोजी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात होते. कारंजा ...

शेतकऱ्यांच्या समस्या साेडविण्यास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा
कामरगाव येथील जिप कनिष्ठ महाविद्यालय व कला महाविद्यालयातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ३ सप्टेंबर रोजी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात होते. कारंजा तालुक्यात ई- पीक पाहणी व नोंदणी उपक्रम १०० टक्के यशस्वी व्हावा या उद्देशाने २ व ३ सप्टेंबर रोजी कामरगाव येथील इयत्ता अकरावी व बारावी, तसेच पदवी विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास चिंतामनी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. उद्धव जाने यांच्यासह महाविद्यालयीन प्राध्यापक वृंदाची तसेच स्थानिक सरपंच साहेबराव तुमसरे, मंडळ अधिकारी देवेंद्र मुकुंद, तलाठी विनोद नागलकर, पोलीस पाटील नितीन शिंगाडे आणि जिप कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. अरुणा देशमुख यांची उपस्थिती होती. ई-पीक पाहणी ॲप हे एक डिजिटल ॲप असून, या ॲपच्या माध्यमातून ॲण्ड्राइड मोबाइलमधून शेतकऱ्यांना आपला पीकपेरा नोंदविता येतो; परंतु अनेक शेतकऱ्यांकडे ॲण्ड्रॉइड मोबाइल नसल्याने, तसेच मोबाइल हाताळता येत नसल्याने या उपक्रमाच्या यशस्वीतेत अडचण येत आहे. ही अडचण दूर करण्याच्या दृष्टीने या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.