काेराेना काळातही ३.३७ काेटी रुपयांचा शिक्षणकर वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:27 IST2021-02-05T09:27:54+5:302021-02-05T09:27:54+5:30
वाशिम : काेराेनामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद असल्या तरी नगर परिषदेकडून विविध प्रकारांच्या हाेत असलेल्या करवसुलीतील शिक्षण ...

काेराेना काळातही ३.३७ काेटी रुपयांचा शिक्षणकर वसूल
वाशिम : काेराेनामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद असल्या तरी नगर परिषदेकडून विविध प्रकारांच्या हाेत असलेल्या करवसुलीतील शिक्षण कर माेठ्या प्रमाणात वसूल करण्यात आल्याचे जिल्ह्यातील नगर परिषदेने केलेल्या करवसुलीच्या आकड्यावरून दिसून येते.यावेळी जिल्ह्यातील चारही नगरपालिकेतर्फे चालू वर्षात ३ काेटी ३७ लाख ९ हजार ७१ रुपये शिक्षण कर जमा करण्यात आला.
शासनातर्फे शिक्षणासाठी पुरविल्या जात असलेल्या सुविधेच्या स्वरूपात नागरिकांकडून शिक्षण कर वसूल केला जाताे. हा कर नगर परिषद वसूल करुन महसूल विभागाला देताे. यामध्ये शिक्षणाशी निगडीत असलेल्या सुविधांवर खर्च अपेक्षित असताे.
..............
गतवर्षीच्या तुलनेत केवळ ४८ लाख कर कमी
जिल्ह्यातील चारही नगरपालिकांतर्फे यावर्षी ३.३७ काेटी रुपयांचा शिक्षण कर वसूल करण्यात आला. हा कर गतवर्षीच्या तुलनेत समान असल्याचे वसुलीच्या आकड्यावरून दिसून येते. गतवर्षी चारही नगर परिषदेच्या वतीने ३ काेटी ८५ लाख ६९४ रुपये शिक्षण कर वसूल करण्यात आला हाेता. गतवर्षीच्या तुलनेत हा कर ४८ लाख रुपयाने कमी असल्याचे दिसून येते. कर विभागाने करवसुली करून सदर रक्कम महसूल विभागाकडे जमा केली.
............
साडेतीन काेटी शिक्षणकर
नगर परिषदेतर्फे एकत्रित मालमत्ता, शिक्षण, राेहा, वृक्ष, घनकचरा आदी संदर्भात करवसुली केल्या जाते. या वसुलीतून सुविधा पुरविल्या जातात. यावर्षी उद्दिष्टाकडे जिल्हयातील नगरपालिकांनी कूच केले आहे. चालू वर्षात साडेतीन काेटींच्या घरात शिक्षण कर वसूल झाला आहे.
-- अ.अजिज अ. सत्तार
कर निरीक्षक वाशिम, नगर परिषद वर्ग कर्मचारी संघटना विदर्भ संघटक
............
नगर परिषदनिहाय वसूल शिक्षण कर
६.९३ लाख कारंजा
३.७९ लाख मंगरूळपीर
सात लाख वाशिम
१६ लाख रिसाेड
.............
गतवर्षी प्राप्त शिक्षणकर ३.८५ काेटी
चालू वर्षी प्राप्त शिक्षणकर ३.३७ काेटी